Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसच्या 10 आमदारांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोठचिठ्ठी दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अशोक

तुम्ही उद्या ब्लू फिल्म टाकून त्याचं उत्तर मागल; चित्रा वाघ यांना सवाल.
परमवीर सिंग यांनी सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची; पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप
जनताच भाजपचे ऑपरेशन करेल ः नाना पटोले

मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोठचिठ्ठी दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेस पक्षातील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाच्यावतीने लोणावळा येथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शिबिराला काही आमदार उपस्थित नव्हते, अशा आमदारांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
अनुपस्थित आमदारांमध्ये माधव पवार-जावळगावकर, मोहन हंबर्डे, गीतेश अंतापूरकर, सुलभा खोडके, जीशान सिद्दीकी, अमीन पटेल, अमित झनक यांचा समावेश होता. पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राज्य नेतृत्वाला हा विषय गांभीर्याने घेऊन विनाकारण अधिवेशनाला गैरहजर राहणार्‍या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे समजते. चव्हाण यांच्या पक्षांतराच्या पार्श्‍वभूमीवर आणि नजीकच्या काळात काँग्रेसचे डझनभर आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्‍वभूमीवर आमदारांची अनुपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे. चव्हाण यांनी 13 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. 15 फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आलेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सातहून अधिक आमदार गैरहजर होते.

COMMENTS