Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींच्या भारत-जोडो यात्रेत धक्काबुक्की

माजी मंत्री किरण चौधरी झाल्या जखमी

चंदीगड/वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत-जोडो यात्रेदरम्यान शनिवारी झालेल्या धक्काबुक्कीत अनेक कार्यकर्त्यांचे कपडे फाडण्यात

वापरात नसलेल्या खात्यातून परस्पर काढले पैसे
अभिनेते क्षितीज झारापरकर यांचे निधन
केदारनाथ मंदिर भक्तांसाठी खुलं !

चंदीगड/वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत-जोडो यात्रेदरम्यान शनिवारी झालेल्या धक्काबुक्कीत अनेक कार्यकर्त्यांचे कपडे फाडण्यात आले. यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या किरण चौधरी जखमी झाल्यात. त्यांना कर्नाल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा सध्या हरियाणातून प्रवास करीत आहे. यात्रेचा शनिवारी हरियाणातील दुसरा दिवस आहे. ही यात्रा कर्नालजवळील मधुबन येथे पोहोचली तेव्हा कार्यकर्त्यांची गर्दी राहुल गांधींच्या सुरक्षा गराड्यात घुसण्यासाठी अनियंत्रित झाली. राहुलसोबत धावणारे सीएलपीचे माजी नेते आणि माजी मंत्री किरण चौधरी गर्दीत अडकले. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत चौधरींच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना कर्नाल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात्रेत होणारी काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी पाहता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  

COMMENTS