औरंगाबाद प्रतिनिधी-ः मध्यवर्ती आगारात मंगळवारी एक तर बुधवारी नऊ वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. 18 मेपासून छत्रपती संभाजीनगर ते पुणे
औरंगाबाद प्रतिनिधी-ः मध्यवर्ती आगारात मंगळवारी एक तर बुधवारी नऊ वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. 18 मेपासून छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर ही शिवाई नावाची ई-बस धावणार आहे. विभागाला एकूण 200 बस मिळणार आहेत. राज्यात 1 जून 2022 रोजी पुणे अहमदनगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस सुरू झाली. टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाला पहिल्या टप्प्यात दहा बस मिळणार आहेत.
झ ई-बस पूर्णपणे वातानुकूलित आहे. बसमध्ये वायफाय, दोन स्क्रीन आहेत. आरामदायी प्रवास, पुशबॅक सीट आहेत. दरवाजा स्वयंचलित असणार आहे. 45 प्रवासी आसन क्षमता आहे. यामध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण राखीव असणार आहे.
भाडे शिवशाहीप्रमाणेच असेल. प्रत्येक आसनाजवळ मोबाइल चार्जिंग, रीडिंग लॅम्पची सोय आहे.18 मेपासून छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर ही शिवाई नावाच्या ई-बसला सुरुवात झाली असून ज्येष्ठ प्रवासी निंबा ठाकरे, मनिषा ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी यावेळी महाव्यवस्थापक नियंत्रण सामाजिक क्रमांक दोन नितीन मैद, प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी बद्रीप्रसाद मांटे, विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर, वाहतूक अधिकारी अमोल अहिरे, आगार व्यवस्थापक लक्ष्मण लोखंडे, अनिता कोकाटे सहाय्यक निरीक्षक बाबासाहेब सांळुके आदींची उपस्थिती होती.
COMMENTS