Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाला हादरे शिवसेनेसह धनुष्यबाण शिंदे गटाला

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात शुक्रवारी ठाकरे गटाला मोठे हादरे बसायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणीसाठी

गहूनंतर साखरेच्या निर्यातीवर बंदी
बायकोला लहान भावासोबत नको त्या अवस्थेत पाहिले मग बायकोनेच पतीला… | LOK News 24
टाटा सन्सचे माजी संचालक आर.के. कृष्णकुमार यांचे निधन

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात शुक्रवारी ठाकरे गटाला मोठे हादरे बसायला मिळाले. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणीसाठी सात न्यायमूर्तीच्या घटनापीठाची मागणी न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर ठाकरे गटाला सायंकाळी केंद्रीय निवडणूक आयोगाने दुसरा हादरा देत, शिवसेना आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले आहे.

  गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना कुणाची ? धनुष्यबाण चिन्ह नेमके कुणाला मिळणार ? असा प्रश्‍न उपस्थित होत होता. मात्र शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेसह धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.  शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली. यानंतर आता याबाबत मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानुसार पक्षाचे नाव शिवसेना आणि चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याआधी निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती, मात्र त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केल्यामुळे ठाकरे गट पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची चिन्हे आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गटाने यापूर्वी कागदपत्रे सादर केली होती. निकाल आपल्या पदरात पडावा यासाठी दोन्ही गटात प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. परंतु, आता ठाकरे गटाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळाल्याने मोठा धक्का ठाकरे गटाला बसला असे मानले जात आहे. पक्षचिन्हाच्या हक्काबाबत 12 डिसेंबर 2022 रोजी नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली होती. त्याला ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रतिनिधी हजर होते. सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात वकिलांची फौज हजर होती.
गेल्या काही दिवसांपासून याकडे लक्ष लागले होते. 78 पानांची निवडणूक आयोगाचे निकालपत्र असून ऑक्टोबर 2022 पासून हे प्रकरण चर्चेत आले होते. याशिवाय शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्याने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणाला मोठे वळण देणारा निर्णय आता जाहीर झाला आहे.

शिंदे गटाला मानले खरी शिवसेना- केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाच्या संघर्षात एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना मानली आहे. आयोगाने शुक्रवारी सायंकाळी आपल्या आयोगाच्या वेबसाईटवर 78 पानांचा निकाल जाहीर केला आहे. यात शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. आयोगाला उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाची रचना अलोकतांत्रिक असल्याचे आढळून आले. यामध्ये कोणतीही निवडणूक न घेता लोकांची नियुक्ती करण्यात आली. निवडणूक आयोगाला असेही आढळून आले की शिवसेनेच्या मूळ घटनेत गुप्तपणे अलोकतांत्रिक प्रथा परत आणल्या गेल्या आणि पक्षाला खाजगी जागेवर आणले. या पद्धती निवडणूक आयोगाने 1999 मध्ये नाकारल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचा दावा संपुष्टात आला आहे. 

COMMENTS