शिवसेना आमदाराला ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना आमदाराला ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक

मुंबई : शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला क्राईम ब्रांचने राजस्थानातून अटक केलीय. मौसम दिन मोहम्मद मेयो असे आरोपीचे नाव आ

साई तुझं लेकरू ‘टाइमपास – 3’ मधील पहिले धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला.
दुभाजक तोडून BMW थेट ट्रकवर | LOKNews24
आचारसंहिता आदर्श असली तरी…….!

मुंबई : शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला क्राईम ब्रांचने राजस्थानातून अटक केलीय. मौसम दिन मोहम्मद मेयो असे आरोपीचे नाव आहे. आरोपी मुलगी बनून आमदारांशी सेक्सचॅट करीत असे. यासंदर्भात भरतपूरचे पोलिस अधीक्षक देवेंद्र कुमार विष्णोई यांनी सांगितले की, मुंबईच्या कुर्ला परिसरातील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्याशी आरोपी मुलगी बनून सेक्स चॅट करीत असे. आरोपीने व्हिडीओ आमदारांना व्हिडीओ कॉल करून तो रेकॉर्ड केला. त्यानंतर तो आमदार कुडाळकर यांना ब्लॅकमेल करू लागला. याप्रकरणी कुडाळकर यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सायबर क्राईमने आरोपीचे लोकेशन ट्रेस केले असता सदर आरोपी राजस्थानच्या भरतपूर येथे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर क्राईम ब्रांचने राजस्थान पोलिसांच्या मदतीने सिक्री गावात छापा टाकून आरोपीला अटक केली. कागदोपत्री कारवाईनंतर सदर आरोपीला मुंबई क्राईम ब्रांचच्या स्वाधीन करण्यात आलेय.

COMMENTS