Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात शिवसेना महायुतीचा विजय मेळावा ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थिती

।संगमनेर : आमदार अमोल खताळ यांच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार २४ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्य मंत्री आणि  शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकन

स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क : मुख्यमंत्री फडणवीस
कुंभमेळा निमित्त होणारी विकास कामे वेळेत पूर्ण करावीत : मंत्री छगन भुजबळ
बार्शीत एकच ठिकाणी सापडले गवत्या जातीचे 18 साप 
Displaying PHOTO-2025-08-21-11-25-47.jpg

।संगमनेर : आमदार अमोल खताळ यांच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार २४ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्य मंत्री आणि  शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे  तसेच राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल सर्व मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महायुतीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,

     संगमनेर विधानसभा मतदारसंघावर गेली चाळीस वर्षापासून एकहाती सत्ता असणार्यांचे साम्राज्य उलथवून टाकत एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा अमोल खताळ यांच्या रूपाने संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वप्रथमच शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या समस्या आणि अडचणी मांडण्यासाठी हक्काचे ठिकाण असणार्या आ. अमोल खताळ व महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवसेनेचे संपर्कमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, माजी खा डॉ सुजय विखे, नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे,  माजी खासदार सदाशिव लोखंडे, आ. भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे उत्तर   जिल्हाप्रमुख कमलाकर कोते व नितीन औताडे, दक्षिण जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, अनिल शिंदे, महिला आघाडी उत्तर जिल्हाप्रमुख सुनिता शेळके,  दक्षिण जिल्हा प्रमुख विमल पुंडे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. आमदार अमोल खताळ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर कार्यालयापासून जाणताराजा मैदानापर्यंत शिवसेना महायुती पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर सभेच्या माध्यमातून संगमनेरकर जनतेचे आभार मानणार आहेत. तरी या जाहीर सभेसाठी संगमनेर शहर आणि तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS