Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक मध्ये पार पडला शिवसेना संवाद मेळावा  

पालकमंत्र्याच्या उपस्थितीत हजारो सैनिक दाखल

नाशिक प्रतिनिधी -  काल मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात संवाद मेळाव्याला हजारोंच्या संख्येेने शिवसैनिक उपस्थित

‘आपडी-थापडी’चा टीजर लाँच, श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत
जोगेश्‍वरवाडीतील नागरिकांना रेशनचा माल मिळावा ; अन्यथा उपोषण
राजकारणातील उलटफेर

नाशिक प्रतिनिधी –  काल मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात संवाद मेळाव्याला हजारोंच्या संख्येेने शिवसैनिक उपस्थित होते. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात अनेक विकास कामे सुरू आहेत.ही सर्व कामे आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवायची आहेत. तसेच शिवसेनेची संपूर्ण राज्यभरात यशस्वी घोडदौड सुरू आहे. आपली संघटना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या काम करायला हवे. येत्या निवडणुकीत आपल्याला महाराष्ट्रात “अबकी बार ४५” चा आकडा गाठायचा आहे. आणि हे तेव्हाच शक्य आहे ज्यावेळी आपण मुख्यमंत्री महोदय ज्या पद्धतीने आज संपूर्ण राज्यभरात एक संघटनेचे कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत, त्याच पद्धतीने आपल्याला देखील काम करायला हवे, असे आवाहन यावेळी खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब सर्व उपस्थित शिवसैनिकांना केले.

यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब, खासदार हेमंत गोडसे साहेब, आमदार सुहास कांदे साहेब, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

COMMENTS