नवी दिल्ली ः ठाकरे गटाची संपत्ती एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही या
नवी दिल्ली ः ठाकरे गटाची संपत्ती एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे. तसेच, याचिकाकर्त्यांला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. ‘याचिका दाखल करणारे तुम्ही कोण?’, असा संतप्त सवाल न्यायालयाने विचारला आहे.
शिवसेना पक्षावर ज्याप्रमाणे शिंदे गटाने दावा सांगत शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले होते. त्यानंतर आयोगाने शिवसेना शिंदे गटाचा पक्ष असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर अॅड. आशिष गिरी यांनी शिवसेना भावन आणि पक्षाची संपत्ती शिंदे गटाला मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. शिवसेना भवन, शाखा, पक्षाची संपत्ती एकनाथ शिंदे यांना द्यावा, अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा तिखट सवाल करत कोर्टाने याचिकार्त्यला फैलावर घेतले. तसेच ही याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. तब्बल 40 आमदार सोबत घेऊन ते भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यांनाच शिवसेना पक्षही मिळाला. इतके झाल्यानंतर शिंदे यांनी आपण शिवसेना भवनावर दावा सांगणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. त्यात शिवसेना भवन, शिवसेना पक्षाचा निधी एकनाथ शिंदे यांना द्यावा. सोबतच शिवसेनेच्या शाखा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी केली होती. अॅड. आशिष गिरी यांच्या या याचिकेवर गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता शिवसेना भवन, शिवसेनेची संपत्ती आणि शिवसेनेच्या शाखांवरही उद्धव ठाकरे यांचा ताबा राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगपुरा भागात उभारलेल्या शिवसेना भवनावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दावा सांगत ते ताब्यात घेणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, हा खुळचटपणा असून त्यांना सत्तेचा माज आला आहे, असे उत्तर शिवाई सेवा ट्रस्टचे विश्वस्त सुभाष देसाई यांनी दिले होते. त्यानंतर हे प्रकरण तूर्तास तरी थंडबस्त्यात गेले आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह यापूर्वीच दिले आहे. हे नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळावे, असा दावा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी केला होता. तशी कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे दोन्ही गटाने दिली होती.
COMMENTS