Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘बारसू रिफायनरी’ प्रश्‍न पेटला पोलिसांकडून बळाचा वापर

अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या खासदार विनायक राऊत यांना अटक

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित असणार्‍या रिफायनरी प्रकल्पाला विरोध वाढला असून, शुक्रवा

अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना अखेर बिनविरोध
BREAKING: खा. सुजय विखे पाटील यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल | पहा Lok News24
घर मोलकरीण कामगारांच्या प्रश्‍नांसाठी लढा उभारू – बबली रावत

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित असणार्‍या रिफायनरी प्रकल्पाला विरोध वाढला असून, शुक्रवारी पोलिससांनी आंदोलकांवर बळाचा वापर करत लाठीचार्ज केला, यासोबतच आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांडया फोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला, यात अनेक आंदोलक बेशुद्ध पडले आहेत. अनेक नागरिक जखमी झाले आहे. डोकं फुटले तरी चालेल. आम्ही त्यांना काही देणार नाही. अशी भूमिका आंदोलनकर्त्यां महिलांनी घेतली आहे.
या आंदोलनात सहभागी झाल्याने ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे हे आंदोलन आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. अशी माहिती स्वत: विनायक राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. पोलिसांनी पत्रकारांनाही प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले आहे. पोलिसांनी स्थानिकांचा विरोध बळाचा वापर करत मोडून काढला आहे, तरीही ग्रामस्थांकडून प्रकल्पाला विरोध सुरू आहे. यात आज ठाकरे गटाचे खासदार आंदोलकांच्या बाजुने उभे राहिल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. बारसूत रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. विनायक राऊत यांनी पोलिसांकडून अमानुष अत्याचार होत असल्याचा आरोप देखील केला होता.
कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी ’रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग’ प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्‍वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे.

3 हजार 400 एकरवर प्रकल्प प्रस्तावित-रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे हा प्रकल्प प्रस्तावित आहे. तब्बल 3 हजार 400 एकर जमिनीवर क्रूड रिफायनरीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बारसू रिफायनरीसाठी चाचण्या करण्यासाठी 84 कूपनलिका खोदायच्या आहेत. तसेच क्रूड टर्मिनलसाठी साठी 501 एकर जमीन लागणार आहे. ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात आहे.

आमचा अंत पाहू नका ः आंदोलक संतप्त- राज्य सरकारने शांततेत सर्वांशी संवाद साधा, आमचा अंत पाहू नका, आमच्यावर लाठीहल्ला केला. धूर सोडल्यामुळे लोकांना त्रास झाला आहे. आम्ही काय चोरी करण्यासाठी इथे आलो आहे का? असा सवाल आंदोलकांनी केला आहे. आंदोलनाच्या वेळी 400 पेक्षा अधिक लोक उपस्थित असून, यामध्ये सर्वाधिक महिला आहेत. आमच्या जमिनी आम्ही कोणाला ही घेऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित- बारसुतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. या कालावधीमध्ये सरकारसोबत चर्चा होणार आहे. तीन दिवसांमध्ये माती सर्वेक्षण थांबलं नाही तर पुन्हा आंदोलन सुरु करु, असा इशारा देण्यात आलेला आहे. आंदोलक काशिनाथ गोरले यांनी याबाबत माहिती दिली.

आंदोलकांवर लाठीचार्ज नाही ः मुख्यमंत्री शिंदे- बारसूत सध्या शांतता आहे. बारसूत कोणातही लाठीचार्ज केला नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. आंदोलनात बाहेरच्या लोकांचाही समावेश आहे. बाहेरचे काही लोक आंदोलनस्थळी आल्याची माहिती मिळाली आहे. शेतकर्‍यांवर जबरदस्ती करणार नाही. असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS