Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

याची देही याची डोळा ऐसा अनुभवला शिर्डी परिक्रमेचा सोहळा

शिर्डी परिक्रमेत हजारोंच्या संख्येने साईभक्त सहभागी

शिर्डी प्रतिनिधी - याची देही याची डोळा ऐसा अनुभवला शिर्डी परिक्रमेचा सोहळा असा सुखद अनुभव शिर्डीत पार पडलेल्या शिर्डी परिक्रमा महोत्सवात साईभ

दक्षिण नगर जिल्ह्यातील रस्ते आता दुरुस्त होणार ; केंद्र सरकारने मंजूर केले 84 कोटी
रांजणगावच्या सरपंचपदी संध्याताई देशमुख
Ahmednagar : नगरमध्ये किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी | LOKNews24

शिर्डी प्रतिनिधी – याची देही याची डोळा ऐसा अनुभवला शिर्डी परिक्रमेचा सोहळा असा सुखद अनुभव शिर्डीत पार पडलेल्या शिर्डी परिक्रमा महोत्सवात साईभक्तांनी व्यक्त केला असून साईसंस्थानच्या प्रमुख पाच उत्सवाबरोबरच आता शिर्डी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या शिर्डी परिक्रमा या सहाव्या उत्सवाची भर पडली आहे. या अभुतपुर्व सोहळ्यात देशविदेशातील हजारोंच्या संख्येने साईभक्त सहभागी झाले असल्याचे पहावयास मिळाले.

दरम्यान जगाला श्रद्धा आणी सबुरीचा मंत्र देणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. समृध्दतेने नटलेल्या आपल्या भारत देशात गुरू शिष्याची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे. महाराष्ट्र ही संताची भुमी म्हणून प्रसिद्ध आहे. भगवान श्रीरामांनी देखील चौदा वर्षे वनवास याच महाराष्ट्राच्या पवित्र भुमीमध्ये केला असून अहमदनगर जिल्हा प्रभू श्रीराम, लक्ष्मण यांच्या पवित्र पदकमलाने पावन झाला आहे. अहमदनगर जिल्हयात सर्वाधिक तिर्थक्षेत्र असून याच जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी नगरी श्री साईबाबांच्या पदस्पशनि पावन झाली आहे. शिडीं आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र म्हणून नावलौकिक प्राप्त आहे. काल बुधवार दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी साईबाबा संस्थानच्या स्थापनेला १०२ वर्षे पूर्ण झाली आहेत. श्रीराम नवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी विजयादशमी, दिपावली आदी प्रमुख उत्सव श्री साईबाबांच्या हयातीपासून आजतागायत सुरू आहे. या पाच उत्सवांसाठी जगभरातून लाखो भाविक साईचरणी नतमस्तक होत असतात. परंतु आता साईबाबा संस्थानच्या या प्रमुख पाच उत्सवांमध्ये मागील चार वर्षापासून शिडीं ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या शिर्डी परिक्रमा या नवीन उत्सवाची भर पडली आहे. दि.१३ फेब्रुवारी १९२२ हा साईसंस्थान स्थापना दिन असल्याने या दिनाचे औचित्य साधून शिर्डी शहरातील ग्रिन एन क्लिन शिडीं फाऊंडेशन तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील चार वर्षांपासून शिर्डी परिक्रमा उत्सव सुरू करण्यात आला आहे.

यंदाचे हे पाचवे वर्ष असून काल बुधवार दि १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे सहा वाजता आओ साई खंडोबा मंदिरापासून सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज, महंत काशिकानंदगीरी महाराज, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, माजी विश्वस्त सचिन तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, सामाजिक कार्यकर्ते नितीन कोते, माजी नगरसेवक रविंद्र गोंदकर, मनसेचे माजी नगरसेवक दत्तात्रय कोते, साई निर्माण उद्योग समूहाचे संचालक ताराचंद कोते, विकास गोंदकर, साईमंदीर कोहाळे संचालक सदाशिव घोडे, सामाजिक कार्यकर्ते योगेश तिव्या, खंडोबा मंदिर ट्रस्ट शिर्डी, उपाध्यक्ष अजय नागरे, मुकुंद गोंदकर, साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार,  संचालक रामा गागरे, नवनाथ थोरे, शिवसेना नेते अक्षय तळेकर, अक्षय महाजन, युवा नेते नानासाहेब शिंदे, साईश्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व पत्रकार संजय महाजन, व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष तुषार महाजन आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी मध्यप्रदेशातील रतलाम येथील पुजारी व झाकी, फिरत्या वाहनांवर प्रात्यक्षिक करणारे पथक, बिड तसेच नागपूर येथील साईरथ याबरोबरच बाराणसी येथील डमरू पथक विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या परिक्रमेसाठी देशविदेशातून पन्नास हजार भाविकांनी हजेरी लावून १४ किमी अंतर असलेली शिडीं परिक्रमा पूर्ण केली. यावेळी ढोल ताशा, झांज पथक, मुलींचे नृत्य पथक, साईबाबांच्या जिवनपटावर आधारित चित्ररथ, लेझीम पथक, विविध वाद्ये, टाळ मृदंग भजनी मंडळ आदींचा समावेश होता. तर १४ किमीच्या प्ररिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी सडा, आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. अनेक साईभक्तांतर्फे हजारोंच्या संख्येने पायी चालणाऱ्या शिर्डी परिक्रमा वासीयांसाठी जागोजागी चहा पाणी, नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती. परिक्रमेची सांगता दुपारी बारा वाजता साईमंदीरा शेजारील शताब्दी मंडपात करण्यात आली.

COMMENTS