Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत मुलांनी तिरंग्यासह साकारला 75

अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा रॅली उत्साहात

शिर्डी/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेतल्यावर एकामागे एक उभे राहात सुरेख 75 आकडा साकारला व देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य महोत्स

बाळ बोठेला दणका…जामीन अर्ज फेटाळला…
विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे गुणवंताचा सन्मान
पूर व अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी संतप्त शेतकऱ्यांचा बालमटाकळी येथे २ तास रास्ता रोको आंदोलन….!

शिर्डी/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेतल्यावर एकामागे एक उभे राहात सुरेख 75 आकडा साकारला व देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य महोत्सवात अनोखे अभिवादन केले. यानिमित्ताने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा रॅलीचे उत्साहात सोमवारी आयोजन करण्यात आले होते.
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिर्डी आणि भारत सरकारच्या सूचना एवं प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, अहमदनगर क्षेत्रीय यांच्यावतीने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक, घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने या देदीप्यमान इतिहासाचे संस्मरण करण्यासाठी 25 जुलै रोजी हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत ही रॅली काढण्यात आली होती. शहीद भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडीत नेहरू, लोकमान्य टिळक, भारत माता आणि मौलाना आझाद यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. या रॅलीचे उदघाटन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते झाले. या रॅलीच्या सांगता प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ‘75’ हा अंक तयार केला आणि महाविद्यालयामध्ये येऊन रॅली विसर्जित करण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले होते. या रॅलीच्या उदघाटनाच्यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रीय संचार ब्युरो, अहमदनगर येथील माधव जायभाये, पी.शिवकुमार, प्राचार्य विकास शिवगजे, गंगाधर वरघुडे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. ही रॅली यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा.मुबीन शेख यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. रॅली नंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. प्रा.वंदना झरेकर यांनी सूत्रसंचालन केले.

शेजारील चारजणांना देणार तिरंगा
स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा रॅली याबाबत माहिती प्राचार्य विकास शिवगजे यांनी दिली. ते म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या घराशेजारील चार नागरिकांना तिरंगा ध्वज देऊन व सर्व नियमांचे पालन करून नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवा यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयाचे विद्यार्थीही शहरातील प्रत्येक घरात जाऊन याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहेत.

COMMENTS