Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध; राष्ट्रवादी-14 तर भाजप 4 राष्ट्रवादीची सत्ता कायम

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गुरुवारी बिनविरोध करण्यात सर्व गटाच्या पक्ष नेत्यांना यश आले आहे. कृषी उत्

चला जाणूया नदीला अभियानांतर्गत 12 ते 31 डिसेंबरदरम्यान नदी संवाद यात्रा
एसटीच्या संपप्रश्‍नी खा. शरद पवार यांची मध्यस्थी?
सांगलीत महापूर काळात आपत्ती प्रतिसाद यंत्रणा

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक गुरुवारी बिनविरोध करण्यात सर्व गटाच्या पक्ष नेत्यांना यश आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक स्थिती नाजूक बनल्यामुळे सर्वच पक्ष व गटाच्या नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे निश्‍चित केले होते. राष्ट्रवादीचे विद्यमान आ. मानसिंगराव नाईक, माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक व भाजपाचे सत्यजित देशमुख तसेच सम्राट महाडिक गटाने सदरची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ही निवडणूक पार पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने आ. मानसिंगराव नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी यशवंत ग्लुकोज ऑफिसला स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करून राष्ट्रवादीच्या नावांची यादी फायनल केली. तसेच पंचायत समितीच्या हॉलमध्ये भाजपा नेते सत्यजित देशमुख यांच्याशी चर्चा करून उमेदवारांची नावे फायनल केली आणि निवडणूक बिनविरोध झाली.
बिनविरोध निवड झालेले गटनिहाय उमेदवार : सोसायटी गट : सुजित आबासाहेब देशमुख-कोकरूड (भाजपा), आनंदा रंगराव पाटील-कणदूर (राष्ट्रवादी), पोपट जयसिंग चरापले-मांगले (राष्ट्रवादी), सुरेश महादेव पाटील-करमाळा (राष्ट्रवादी), पांडुरंग शंकर गायकवाड-येळापूर (राष्ट्रवादी), महादेव बाबुराव जाधव-रेड (राष्ट्रवादी), सखाराम तुकाराम दुर्गे-गुढे (राष्ट्रवादी). महिला गट : सुनंदा बाबासो पाटील-कापरी (भाजपा), महिला गट : जयश्री दाजीबा पाटील-पाडळी (राष्ट्रवादी). ओबीसी गट : संदीप शंकर चोरगे- हातेगाव (राष्ट्रवादी). भटक्या विमुक्त जमाती गट : हरिभाऊ पांडुरंग पावणे-वाकुर्डे खुर्द (भाजपा). ग्रामपंचायत गट : संग्राम आनंदराव पवार-सागाव (राष्ट्रवादी), विजय बाबुराव महाडिक-भटवाडी (राष्ट्रवादी). आर्थिक दृष्ट्या दुर्बल : संजय आकाराम सावंत,कोंडाईवाडी, (भाजपा). अनुसूचित जमाती : मारुती महादेव कांबळे येळापूर (राष्ट्रवादी), व्यापारी गट : मुनीर यासीन डांगे आरळा (राष्ट्रवादी). प्रताप दिलीप दिलवाले शिराळा (राष्ट्रवादी). हमाल तोलाईदर गट : वासिम नयूम-मोमीन, शिराळा (राष्ट्रवादी).
यापूर्वी स्व. फत्तेसिंगराव नाईक व माजी विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख हे दोन गट एकत्र तर माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक गट अशी लढत होत होती. पहिली निवडणूक बिनविरोध झाली होती. दुसर्‍या निवडणुकीवेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक गट विरुध्द आ. मानसिंगराव नाईक व सत्यजीत देशमुख गट एकत्रित निवडणूक लढवली होती. यामध्ये आ. मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी सर्व जागा जिंकल्या होत्या. यावेळी पहिल्यांदा आ. मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक हे गट एकत्र आले आहेत. भाजपचे सत्यजीत देशमुख व सम्राट महाडिक हे गट एकत्र आले होते.

COMMENTS