Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांना धक्का

ईडी करणार 11 कोटींची संपत्ती जप्त

मुंबई प्रतिनिधी - एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटींची संपत्ती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तात्पुरती जप्त क

खेळाडूंना भरपूर प्रोत्साहन देणाऱ्या सारडा महाविद्यालयास पूर्ण सहकार्य : जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले
उत्तराखंडमध्ये भूस्खलन, बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद
बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या अधिकार्‍यांची सेवा खंडित करणार

मुंबई प्रतिनिधी – एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटींची संपत्ती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तात्पुरती जप्त केली होती मात्र आता सदरील जप्त केलेली 11 कोटींची संपत्ती योग्य असल्याचा निर्णय क्वाशी ज्युरीशरी बॉडीने दिला आहे. त्यामुळे सरनाईकांचे ठाण्यातील दोन फ्लॅट्ससह तब्बल 11 कोटींची संपत्ती जप्त करण्याचा ईडीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे सरनाईकांसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.
 यामध्ये सरनाईक यांच्या मालकीचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोड येथील भूखंडावर लवकरच ईडीमार्फत जप्ती येऊ शकते. सरनाईक यांची तब्बल 11.4 कोटींची संपत्ती ईडी ताब्यात घेणार आहे. दरम्यान, ईडीने केलेल्या कारवाई विरोधात सरनाईक न्यायालयात दाद मागू शकतात. 2013 मध्ये एनएसईएल घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी ईडीने चौकशी सुरू केली. एनएसईएल घोटाळा प्रकरणात संचालकांसह 25 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी सुरू झाली होती. या घोटाळ्यातील गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी रिअल इस्टेट, थकीत कर्जाची परतफेड आणि इतक कामांसाठी बेकायदेशीरपणे वापरली असल्याचं निष्पन्न झाले होतं. जवळपास 13,000 गुंतवणुकदारांच्या 5,600 कोटींच्या रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. आस्था ग्रुपकडे एनएसईएलची 242.66 कोटी थकबाकी रुपयांची थकबाकी असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. आस्था ग्रुपने सन 2012-13 या कालावधीत 21.74 कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्टसाठी दिले. त्यापैकी 11.35 कोटी रुपये विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडकडे वळते करण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याची माहिती ईडीने दिली होती. कागदपत्रांची तपासणी आणि मिळालेली माहिती आदींच्या आधारे ईडीने सरनाईकांचे ठाणे येथील दोन फ्लॅट आणि मिरा रोड येथील जमिनीचा काही भाग जप्त केला होता. जप्त केलेल्या संपत्तीची किंमत ही 11.35 कोटी रुपये असून पीएमएलए कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले होते.

COMMENTS