Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यात पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने

या मारहाणीवेळी खासदार राजन विचारे हे देखील घटनास्थळी होते

ठाणे प्रतिनिधी - ठाण्यात तुफान राडा झालेला पाहायला मिळालाय. ठाण्यात पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. किसन नगर

पंतप्रधान मोदींनी लाँच केल्या 9 वंदे भारत ट्रेन
जामीन मंजूर झाल्यावरही नेपाळमधील तरुण राहिला कारागृहात
मंदिरातील तीन दानपेटया चोरट्यांनी फोडल्या

ठाणे प्रतिनिधी – ठाण्यात तुफान राडा झालेला पाहायला मिळालाय. ठाण्यात पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. किसन नगरमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. संबंधित प्रकार कॅमेऱ्यातही कैद झालाय. विशेष म्हणजे या मारहाणीवेळी खासदार राजन विचारे हे देखील घटनास्थळी होते. किसन नगरमध्ये ठाकरे गटाकडून मेळावा घेण्यात येत होता. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर यांच्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय.

COMMENTS