Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

800 कोटींच्या भूखंड घोटाळ्यात शिंदे लाभार्थी

संजय राऊत यांचा थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नाशिक महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अनेक जमिनी सत्ताधारी शि

कोपरगाव बस आगारात वरिष्ठांच्या खुर्च्या रिकाम्या
महाराष्ट्र कुस्ती संघातील वाद पुन्हा चव्हाटयावर
महसूल प्रशासनाकडून डिजीटल सात बाराचे घरपोच वाटप

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नाशिक महापालिकेच्या हद्दीत असलेल्या अनेक जमिनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारने लाटल्या असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
या बाबत त्यांनी ट्विट देखील केले आहे. खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, नशिक भूसंपादन घोटाळा 800 कोटींचा आहे. जनतेच्या पैशांची ही सरळ लूट आहे. मुख्यमंत्री व त्यांच्या मर्जीतले बिल्डर या 800 कोटींचे लाभार्थी असून गृहमंत्री देवेंद्रजी त्यांच्यावर काय कारवाई करणार? लुटलेल्या एक एक पैस्याचा हिशोब द्यावाच लागेल असा सवाल देखील संजय राऊत यांनी या पत्रात केला आहे. या संदर्भात येत्या दोन दिवसांमध्ये पुरावे सादर करेन असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात लिहिलेले पत्र आता व्हायरल होत आहे. हे पत्र संजय राऊत यांनी सीबीआय, आयकर विभाग, ईडी आणि भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेलाही पाठवले असून या बाबत एकनाथ शिंदे आणि तपास यंत्रणा काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

COMMENTS