Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षणआधार फाउंडेशनतर्फे कुत्तरवाडी शाळेस वॉटर प्युरिफायर 

पाथर्डी :  समाजातील गोरगरीब व वंचित घटकांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या शिक्षणआधार फाउंडेशन, कुत्तरवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुत्तरवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला.हा उपक्रम फाउंडेशनच्या सचिव अश्विनी उमेश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला. ओबीसी,अनुसूचित जाती-जमाती तसेच भटक्या-विमुक्त घटकांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणआधार फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, ड्रॉइंग साहित्य, उजळणी पुस्तके, राजा पाट्या व परीक्षा पॅड आदी शैक्षणिक साहित्यही सातत्याने उपलब्ध करून दिले जात आहे. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका  गीता खेडकर, शिक्षिका  नम्रता सातपुते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच पालक उपस्थित होते.

देवळाली प्रवरात 2 लाख 42 हजारांची गावठी दारू जप्त
स्वाधार योजना तालुका स्तरावर लागू करावी ः प्रा. बाबा खरात
शिर्डीत श्री रामनवमी उत्‍सवाला आजपासुन सुरूवात ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

पाथर्डी :  समाजातील गोरगरीब व वंचित घटकांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या शिक्षणआधार फाउंडेशन, कुत्तरवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुत्तरवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला.हा उपक्रम फाउंडेशनच्या सचिव अश्विनी उमेश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला.

ओबीसी,अनुसूचित जाती-जमाती तसेच भटक्या-विमुक्त घटकांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणआधार फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, ड्रॉइंग साहित्य, उजळणी पुस्तके, राजा पाट्या व परीक्षा पॅड आदी शैक्षणिक साहित्यही सातत्याने उपलब्ध करून दिले जात आहे. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका  गीता खेडकर, शिक्षिका  नम्रता सातपुते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच पालक उपस्थित होते.

COMMENTS