Homeताज्या बातम्याराजकारण

शेख हसीना आणि परांगदा!

कोणत्याही विचारांची आणि जगातील कोणत्याही देशाची राजकीय सत्ता, कितीही मजबूत असली तरी, जनता जर त्या विरोधात उभी राहिली तर, त्या सत्तेला जनतेच्या सम

शिक्षणरत्न पुरस्काराने दीपक भुजबळ सन्मानीत
घरात बनावट नोटांची छपाई करणारा अटकेत
अकोले नगरपंचायतवर पिचडांनी कमळ फुलवले !, लहामटेंना धक्का

कोणत्याही विचारांची आणि जगातील कोणत्याही देशाची राजकीय सत्ता, कितीही मजबूत असली तरी, जनता जर त्या विरोधात उभी राहिली तर, त्या सत्तेला जनतेच्या समोर अक्षरशः नतमस्तक व्हावं लागतं. परंतु, राज्यकर्त्यांच्या मनात असलेली भीती त्यांना जनतेसमोर पराभूत झाल्यानंतर परांगदा होण्याची जी भूमिका त्यांच्या वाटेला येते, त्याचा अर्थ त्यांची राजकीय सत्ता ही जनतेवर अन्याय करणारी किंवा जनतेच्या विरोधात भूमिका घेणारी असते, असा होतो. भारताजवळच्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर देश सोडण्याची आलेली पाळी, ही एक प्रकारे याच भूमिकेवर शिक्कामोर्तब करते. बांगलादेशातील हिंसाचार किंबहुना तेथील युवक शक्तीचा रस्त्यावर येऊन होणारा विरोध, हा काही भूमिकांना घेऊन जरी होता तरी, निवडणुकीच्या राजकारणात ज्या पद्धतीने सत्ता हस्तगत केली त्या विरोधात युवकांचा अधिक रोष होता. गेली तीन टर्म सत्ता सांभाळलेल्या आणि चौथ्या टर्ममध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या शेख हसीना, या सहजासहजी राजीनामा देतील याची साधी शंकाही जगभरातल्या लोकांच्या मनात नव्हती. परंतु, बांगलादेशच्या युवकांच्या आंदोलनामुळे ज्या पद्धतीने त्या नतमस्तक झाल्या, त्यातून त्यांच्या मनात उद्भवलेल्या भीतीने त्यांना देशाबाहेर परांगदा होण्याची भूमिका आणली. सध्या जगभरातच आणि साधारणत: जगात  जागतिकीकरणाचे जे वादळ आले, त्यानंतर जगातील अनेक देश त्या वादळात सामील झाले. परंतु, अवघ्या २५ ते ३० वर्षा नंतर जागतिकीकरणाच्या या वादळासमोर अनेक देशांच्या राज्यकर्त्यांची पद्धती ही भांडवली हुकूमशाही कडे वळताना दिसते. त्या-त्या देशातले आणि त्या देशात गुंतवणूक करणारे विदेशातील भांडवलदार यांच्यासोबत त्या त्या देशातील सरकारे साटे लोटे करून व्यवस्थेतील मलिदा या उद्योजकांना देत आहेत आणि देशाच्या सर्वसामान्य जनतेला कोणताही हिस्सा मिळणार नाही, याची तजवीज  राज्यकर्ते करत आहेत. खरे तर त्या विरोधातील हा रोष बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा घेण्यात परावर्तित झालेला जसा आपल्याला दिसतो, तसाच तो जगातल्या अन्य देशांच्या ही राज्यकर्त्यांच्या संदर्भात यापूर्वी दिसून आला. खासकरून आखाती देशांमध्ये ही अशा प्रकारच्या लढयांना पाहिले. यापूर्वी अमेरिकेसारख्या देशांमध्ये पराभूत झालेल्या माजी राष्ट्राध्यक्षांनी थेट सार्वभौम सभागृहावरच हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता. ब्राझीलसारख्या देशातही पराभूत झाल्यानंतर सत्तां न सोडण्याचा झालेला प्रयत्न, या सगळ्या गोष्टी जागतिकीकरणाच्या काळात उभ्या राहिलेल्या. भांडवली शक्ती आणि त्यांनी त्या त्या देशातील राजकीय सत्तेला केलेला पतपुरवठा याच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जैसे थे राहून, भांडवलदारांच्या हिताच्या भूमिका राज्यकर्त्यांनी निर्माण केल्या आणि त्याचा परिणाम देशातील जनतेत त्या राज्य राज्यकर्त्यांच्या विरोधात रोष निर्माण झाला.  हा रोष बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनामात परावर्तीत  झाल्याचे आपल्याला दिसून येते. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा हा राजीनामा जागतिकीकरणाच्या काळात राजकारणाचे संदर्भ बदलणारा राहील, यात मात्र कोणतीही शंका नाही. 

COMMENTS