बीड प्रतिनिधी - नगर वरून बीड कडे येत असताना मध्यरात्रीच्या वेळेस अचानक गाडी बंद पडल्याने शेख गालेब यांना गाडी थांबवावी लागली यामुळे ते गाडीच्या ख
बीड प्रतिनिधी – नगर वरून बीड कडे येत असताना मध्यरात्रीच्या वेळेस अचानक गाडी बंद पडल्याने शेख गालेब यांना गाडी थांबवावी लागली यामुळे ते गाडीच्या खाली उतरून गाडी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असताना अचानकपणे लाईटीच्या उजेडात एक प्राणी बिकट अवस्थेत दिसून आला या प्राण्याजवळ जाऊन पाहिले तो प्राणी बिबट्यासारखा दिसणारा प्राणी बिबट्याचे पिल्लु असल्याचे दिसून आले. त्या तरुणाने आपल्या जिवाची पर्वा न करता या प्राण्याला सध्या तरी उपचाराची गरज आहे.बीड जवळ आहे या उद्देशाने त्या तरुणाने चक्क बिबट्याच्या पिलाला आपल्या वाहनातून बीडला आणले. रस्त्याने त्या पिलाला पाणी पाजले, घरी आल्यानंतर त्याला नॉनव्हेज खाऊ घातले. तो उठून उभा राहिला आणि त्याने डरकाळी फोडली, अख्खे कुटुंब घाबरले, तो बिबट्या तंदुरुस्त झाला होता, तात्काळ त्याला त्या तरुणाने पिंजर्यात ठेवले. प्रकरण गंभीर असल्याने तात्काळ वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी गित्ते व कर्मचारी गाडेकर यांना मोबाईलवरून माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्या बिबट्याला ताब्यात घेवून पुढील प्रक्रिया केली. यात विशेष म्हणजे बिबट्या आहे म्हणून न घाबरता त्या तरुणाने चक्क बिबट्याचे प्राण वाचविले हे मात्र खरे आहे.शनिवारी रात्री बीड शहरातील बालेपीर परिसरात राहणारे शेख गालेब हे आपल्या कारचा तांत्रिक बिघाड झाला, त्यानिमित्ताने वाहन थांबविलेले असताना नगरहून बीडकडे येत असताना अंमळनेर जवळ त्यांच्या वाहनात वाहनाच्या उजेडात गाडीसमोर एक बिबट्याचे पिल्लू दिसून आले. ते पिल्लू हलत डुलत नसल्याने गालेब यांनी त्या पिलाजवळ जावून पाहिले असता त्याचा श्वास सुरू होता. गालेब यांनी तात्काळ त्या पिलाला पाणी पाजले, पिल्ल बेशुद्ध अवस्थेत होते, या अवस्थेत एवढ्या अंधारात रस्त्याच्या मधोमध सोडून देणे योग्य नसल्याने गालेब यांनी आपल्या वाहनातून त्या बिबट्याच्या पिलाला घरी आणले, घरी आणल्यानंतर बिबट्याला पुन्हा पाणी पाजून मटन खाण्यासाठी दिले, काही क्षणातच बिबट्याचे पिल्ल उभे राहिले, जोरजोरात डरकाळी फोडू लागले, परिसरातील नागरिक घाबरून गेले. गालेब यांनाही चिंता वाटली, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी गित्ते व कर्मचारी गाडेकर यांना सर्व माहिती देवून संबंधित वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जावून बिबट्याला ताब्यात घेतले. पिल्लू लहान असल्याने आपल्या आईसाठी डरकाळी फोडत असावे या दृष्टीकोनातून वनविभागाने केलेली कामगिरी अभिनंदनीय म्हणावी लागेल.
COMMENTS