नवी दिल्ली ः दिल्ली उच्च न्यायालयाने शरजील इमामला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने बुधवारी शरजीलला जामीन मंजूर केला आहे. दिल्लीच्या जामिया परिसरात
नवी दिल्ली ः दिल्ली उच्च न्यायालयाने शरजील इमामला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने बुधवारी शरजीलला जामीन मंजूर केला आहे. दिल्लीच्या जामिया परिसरात आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी पोलिसांनी शरजीलवर गुन्हा दाखल केला होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेने शरजीलला अटकही केली होती. त्याच्यावर देशद्रोह आणि बेकायदेशीर कृत्ये केल्याचा आरोप करण्यात आला. 28 जानेवारी 2020 रोजी कोर्टाने शरजीलला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर शरजीलची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
COMMENTS