शारदीय नवरात्रोत्सव 2022 : महत्व आणि परंपरा

Homeताज्या बातम्यामनोरंजन

शारदीय नवरात्रोत्सव 2022 : महत्व आणि परंपरा

नवरात्रीतील 2022 वर्षांतील रंग

संपूर्ण विश्‍वाला भयभीत करणारा कोविड संक्रमणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे यंदा सर्व सण, उत्सव धूमधडाक्यात साजरे होतांना दिसून येत आहे. दहीहंडीनंतर झा

महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज २०२२ ची ६.९३ टक्के दराने परतफेड
महाराष्ट्रातही ’लव्ह जिहाद’ विरोधी कायदा हवा – चित्रा वाघ
मुंबईत 24 जानेवारीपासून कामगार कबड्डी स्पर्धा

संपूर्ण विश्‍वाला भयभीत करणारा कोविड संक्रमणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे यंदा सर्व सण, उत्सव धूमधडाक्यात साजरे होतांना दिसून येत आहे. दहीहंडीनंतर झालेला गणेशोत्सव आणि त्यांनतर चाहूल सुरु झाली ती शारदीय नवरात्रोत्सवाची. तर जाणून घेऊन शारदीय नवरोत्सवाबद्दल.
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते आश्‍विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. आश्‍विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हार्‍यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते.पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की, महिषासुर नावाचा राक्षस ब्रम्हाजी चा मोठा भक्त होता. त्याची भक्ती पाहून सर्वश्रेष्ठ ब्रम्हा त्याला प्रसन्न झाले. त्याला वरदान दिले की, कोणी देव, दानव किंवा पुरुष त्याला मारू शकणार नाही. हा वरदान मिळवून महिषासुरामध्ये अहंकार ठासून भरला. तो तिन्ही लोकात आपला हाहाकार माजवू लागला. ह्या गोष्टीने त्रस्त होऊन ब्रह्म, विष्णू, महेश सोबत सर्व देवतांना मिळून देवी शक्तीच्या रूपात दुर्गेला जन्म दिला. असे सांगितले जाते की, देवी दुर्गा आणि महिषासुरमध्ये नऊ दिवसांपर्यंत भयंकर युद्ध झाले आणि दहाव्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि वाईट गोष्टींवर विजय मिळवला. तर, दुसर्‍या कथेच्या अनुसार, त्रेता युगात भगवान रामाने लंकेवर आक्रमण करण्याच्या आधी शक्तीची देवी भगवतीची आराधना केली होती. त्यांनी नऊ दिवसांपर्यंत देवीची पूजा केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी स्वयं त्यांच्या समोर प्रकट झाली. त्यांनी श्रीरामाला विजय प्राप्तीचा आशीर्वाद दिला. दहाव्या दिवशी भगवान रामाने अधर्मी रावणाला परास्त करून त्याचा वध करून लंकेवर विजय मिळवला. या दिवसाला विजया दशमीच्या रूपात ही जाणले जाते.

पेशव्यांच्या दरबारात साजरा व्हायचा नवरात्रोत्सव
नवरात्रोत्सव या उत्सवाला अनेक ऐतिहासिक किनार लाभली आहे. मराठा साम्राज्यात देखील दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या नऊ दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा व मानसन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असे. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते, त्यामुळे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतरही सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा होई. पेशव्यांनीही पुणे येथील पेशवे दरबारात दसरा सणापूर्वी हा वार्षिक दुर्गोत्सव मोठ्या थाटामाटात व भव्यपणे साजरा करण्याची प्रथा चालू ठेवली होती. या उत्सवासाठी लागणार्‍या खर्चाची तरतूद पेशव्यांनी केली होती, हे तत्कालीन कागदपत्रांच्या नोंदीवरून स्पष्ट होते. या नऊही दिवसांत भवानी देवतेची आराधना करून तिच्यासमोर नंदादीप प्रज्वलित करून तिला नैवेद्य दाखवून पूजा केली जाई. देवीचे भक्त म्हणून ओळखले जाणारे भुते आणि गोंधळी हे गोंधळ घालून जागर करीत.

नवरात्रीतील 2022 वर्षांतील रंग
26 सप्टेंबर 2022 पहिली माळ, पांढरा रंग
27 सप्टेंबर 2022 दुसरी माळ, लाल रंग
28 सप्टेंबर 2022 तिसरी माळ, निळा रंग
29 सप्टेंबर 2022 चौथी माळ, पिवळा रंग
30 सप्टेंबर 2022 पाचवी माळ, हिरवा रंग
1 ऑक्टोबर 2022 सहावी माळ, करडा रंग
2 ऑक्टोबर 2022 सातवी माळ, नारिंगी रंग
3 ऑक्टोबर 2022 आठवी माळ, मोरपंखी रंग
4 ऑक्टोबर 2022 नववी माळ, गुलाबी रंग

COMMENTS