Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शारदा विद्या मंदिर गेवराई च्या पार्थ मदुरेची आय.आय.टी. खरगपूर साठी निवड

गेवराई वार्ताहर - शारदा विद्या मंदिर गेवराई चा माजी विद्यार्थी चि. मदुरे पार्थ प्रशांत हा या विद्यालयातून जून 2021 मध्ये दहावी उत्तीर्ण झाला होत

डॉ. बखळे यांचा धाडसीपणा युवकांसाठी प्रेरणादायी ः प्राचार्य शेळके
आतून काँग्रेस कशी पोखरली ?
राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

गेवराई वार्ताहर – शारदा विद्या मंदिर गेवराई चा माजी विद्यार्थी चि. मदुरे पार्थ प्रशांत हा या विद्यालयातून जून 2021 मध्ये दहावी उत्तीर्ण झाला होता त्याने दहावी नंतर अभियांत्रिकी शाखेची निवड केली व त्यासाठी ची प्रवेश परीक्षा जेईई मेन व जेईई अ‍ॅडव्हान्स या परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केल्या व त्याचा प्रवेश आय. आय. टी. खरगपूर (पश्चिम बंगाल) येथे निश्चित झाला. तो तलवाडा ता.गेवराई येथील रहिवाशी असून सामान्य परिस्थितीतून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. त्याने आय. आय.टी साठी एरोस्पेस इंजीनिअरिंग या शाखेत प्रवेश घेतला आहे.
शारदा विद्या मंदिरच्या वतीने त्याचा पालकासह यथोचीत सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र जगदाळे यांनी त्याचे अभिनंदन करताना शाळेच्या इतर मुलांना प्रेरणा मिळेल असे विचार मांडले व मुलांना प्रेरित केले. या प्रसंगी गोगुले सर, पवार, कुलकर्णी, तळतकर, काकडे, क्षिरसागर, करांडे, चौधरी, भोसले, चव्हाण, मरकड हे शिक्षक उपस्थित होते. आय.आय.टी. साठी निवड झालेल्या या विद्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव (दादा) पंडित, संस्थेचे अध्यक्ष मा.आ. अमरसिंहजी पंडित साहेब, संस्थेचे सचिव मा.जयसिंह पंडित साहेब, मा.विजयराजे पंडित साहेब, मा.रणवीर (काका) पंडित, पृथ्वीराजे पंडित तसेच अमृत डावकर सर, गोरकर सर, गोगुले सर, हातोटे सर, यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  पार्थ मदुरेच्या सत्कार प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.

COMMENTS