Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पोंक्षे अभिनेता म्हणून टुकार, पण माणूस म्हणूनही नीच

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची टीका

मुंबई/प्रतिनिधी ः अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या विखारी टीकेला काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शर

परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या लग्नाची तारीख ठरली
श्रीगोंद्यात शिवसेनेच्या युवासेनेत पक्षप्रवेश व कार्यकारिणी जाहीर
चिमठाणे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ

मुंबई/प्रतिनिधी ः अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या विखारी टीकेला काँग्रेसने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच. पण माणूस म्हणूनही नीच असल्याची घणाघाती टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
शरद पोंक्षे यांनी खासदार राहुल गांधी यांच्या आडनावावरून वादग्रस्त टिप्पणी केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी खरे गांधी नाहीत. ते खान आहेत. त्यांनी अ‍ॅफिडेव्हीट करून स्वतःचे आडनाव बदलले. ते महात्मा गांधींचे वंशज नाहीत. गांधी आडनावाचा फायदा घेण्यासाठी त्यांनी हे आडनाव घेतले. ही फिरोज खान यांची पुढची पिल्लावळ आहे. हा इतिहास आहे, असे ते म्हणाले होते. शरद पोंक्षे यांच्या या वादग्रस्त टीकेला काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच, पण माणूस म्हणूनही नीच आहे, असे ते म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी पोंक्षेंवर टीका केली आहे. हा विकृत पोंक्षे अजून काय बोलू शकतोनथुरामची अवलाद, असे ते म्हणालेत. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव येथे स्वातंत्र्यदिनी भारतीय विचार मंचातर्फे शरद पोंक्षे यांचे सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्या घराण्यावर चौफेर टीका केली. राहुल गांधी हे खरंच गांधी आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी राहुल यांचे आजोबा फिरोज गांधी यांचे मूळ आडनाव खान असल्याचा दावा केला. एक तर तू गांधी नाही अन् सावरकर पण नाही. हे ओरिजनल गांधी नसून, खान आहेत. ते महात्मा गांधींचे वंशज नाहीत. त्यांनी त्यांच्या आडनावाचा फायदा घेतला. ही फिरोज खान यांची पुढची पिलावळ असून, हाच त्यांचा इतिहास आहे, असे शरद पोंक्षे म्हणाले.

COMMENTS