पुणे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नुकताच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर तो

पुणे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नुकताच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर तो पुन्हा मागे घेतला. शरद पवारांचा राजीनामा म्हणजे घरगुती तमाशा आहे. ते दुसर्याला कशाकरिता अध्यक्ष म्हणून बसून देतील असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
बावनकुळे म्हणाले, कर्मवीर ऊराव पाटील यांनी तयार केलेल्या सातारा येथील रयत शिक्षण संस्थेची नियमावली, घटना बदलून पवार हे अध्यक्ष होऊ शकतात. असे अनेक शिक्षण संस्था व सहकारी संस्था अस्तित्वात आहे की ज्याच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झालेले आहे. त्यामुळे ज्यांनी मागील 50 वर्ष आपले आयुष्य राजकारणात घातले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार केला त्यामुळे ते दुसर्याला कशाकरिता अध्यक्ष होऊन देतील. ही बाब मला माहिती होती. महाराष्ट्रात ज्याप्रकारे तीन दिवसांचा नौटंकीचा खेळ झाला तो पाहता घरगुती तमाशा असल्याचे दिसून येते. आमचा कोणता डाव यामागे नव्हता. अजित पवार हे आमच्या नेत्यांच्या संर्पकात नसून त्यांना महाविकास आघाडीतील नेतेच बदनाम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जो खेळ झाला ती ठरलेली स्क्रीप्ट होती. शरद पवार यांचे राज्यात मोठे वलय आहे. त्यांनी तयार केलेली स्क्रीप्ट होती त्याप्रमाणे त्यांनी नौटंकी केली. अनेक शिक्षण संस्था , सहकारी साखर कारखाने ताब्यात घेण्यासाठी त्यांनी काय केले हे सर्वांन माहिती आहे. शेवट पर्यंत तेच पक्षाचे अध्यक्ष राहतील. पक्ष टिकवण्यासाठी कधीतरी नौटंकी करावी लागतात. पुढे ते म्हणाले, 228 विधानसभा मतदारसंघाचा प्रवास मी सुरु केलेला आहे. संपूर्ण जिल्हयाचा प्रवास करत, प्रत्येक मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघात 60 हजार घरी आम्ही ‘ घर चलो’ अभियान करत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना याद्वारे लोकांपर्यंत पोहचवून त्यांना लाभ पोहचवत आहे. पक्ष संघटना ही याद्वारे मजबूत करण्यात येत आहे. कर्नाटक मध्ये भाजपला राष्ट्रवादी पक्षाची कोणती गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांनी कर्नाटक मध्ये रोड-शो, प्रचारसभा माध्यमातून पक्षाचा सक्षम प्रचार केला आहे. कर्नाटक मध्ये 105 पेक्षा अधिक जागा भाजपला मिळतील. भाजपचे चिन्ह कमळ असून ते ज्याठिकाणी असते तिथे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचार करतात. पक्ष निवडून आणण्याकरिता आम्ही काम करत असतो.
COMMENTS