Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हवेलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बहुमत

पुणे : राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या असून, या ग्रामपंचायतीमध्ये आपली ताकद कोणत्या मतदार

एच‌एमव्हीपीच्या भीतीचा अवास्तव बाजार!
निर्णयाचा पाठपुरावा केल्यास यशोशिखर गाठता येते – मंगेश चिवटे
ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी

पुणे : राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या असून, या ग्रामपंचायतीमध्ये आपली ताकद कोणत्या मतदारसंघामध्ये किती आहे, याचा प्रत्येक पक्षाला अंदाज आला आहे. राज्यात महायुतीला कौल मिळाला असून, सर्वाधिक जागा या पक्षांना मिळाल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडली असून, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार गट दुसर्‍या स्थानावर असला तरी, हवेली तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन चार महिन्यांचा कालावधी होऊन गेला त्यानंतर काल राज्यातील अनेक भागांत ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. त्यामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची महायुती आणि शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस महाविकास आघाडी या दोन्हींपैकी कोणत्या विचाराच्या ग्रामपंचायतीच्या पॅनलला मतदान केले जाते याकडे सर्वांचे होते. हवेली तालुक्यात शरद पवार यांच्या पॅनलला पसंती मिळाल्याचे दिसून आले. काल पुणे जिल्ह्यातील मुदत संपणार्या 231 पैकी 186 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर 142 पैकी 31 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक पार पडली. पुणे जिल्ह्यात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 80.52 टक्के इतके, तर पोटनिवडणुकीत 79.68 टक्के इतके मतदान झाले. आज हवेली तालुक्यातील कोलावडे साष्टे, खामगाव मावळ येथील मतमोजणी मामलेदार कचेरी येथे पार पडली. निवडणुकीत हवेली तालुक्याने महायुतीला नाकारत शरद पवारांच्या विचाराच्या पॅनलला मतदान केल्याचे पाहायला मिळाले. पेठ 2 सदस्य पदासाठी पल्लवी सुरज चौधरी, आळंदी म्हटोबा 1 सदस्य पदासाठी शंकर शिवाजी जवळकर आणि हिंगणगाव 1 सदस्य पदासाठी मंगल थोरात हे विजयी झाले आहेत.

COMMENTS