Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवार यांचे राजेसाहेब देशमुख यांनी घेतले आशिर्वाद

अंबाजोगाई प्रतिनिधी - नवी दिल्ली येथील 6 जनपथ येथे बुधवार, दिनांक 9 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात
विद्युत वाहिन्यांची देखभाल ड्रोन कॅमेरामुळे अधिक प्रभावी : डॉ. नितीन राऊत
पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव : राज्यपाल रमेश बैस

अंबाजोगाई प्रतिनिधी – नवी दिल्ली येथील 6 जनपथ येथे बुधवार, दिनांक 9 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची सदिच्छा भेट घेवून त्यांचे आशिर्वाद घेतले अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
बुधवार, दिनांक 9 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील 6 जनपथ येथे देशातील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार साहेबांची सदिच्छा भेट घेवून त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी पवार साहेबांनी बीड जिल्ह्यातील पावसाची स्थिती, पिण्याच्या पाण्याची व गुरांसाठी चार्‍याची उपलब्धता, शेतातील पिकांची सद्यस्थिती यांची माहिती घेतली. तसेच बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, ऊसतोड मजूर, कामगार, महिला, श्रमजीवी वर्ग, शेतकर्‍यांचे प्रश्न समजावून घेतले. सोबतच राज्यातील बदलत्या राजकीय समिकरणाचे बीड जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणावर काय परिणाम होतील यावर ही विस्तृत माहिती घेत, सकारात्मक चर्चा केली. आम्हाला भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन आणि अनेक मौलिक सूचना ही केल्या. यावेळी मी, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य दादा पाटील, उपाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे, पशुपतिनाथ दांगट यांची उपस्थिती होती. अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिली आहे.

COMMENTS