Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पक्षफुटीनंतर आज शरद पवार प्रथमच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात

ठाणे / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी कल्याण दौर्‍यावर येत आहेत. उल्हासनगर येथे आयोज

मविआ एकत्र निवडणूका लढवणार ः खा. शरद पवार
पंतप्रधान एका पक्षाचे नसून देशाचे असतात
पवार साहेब कितने पैसे है,गिन गिन के हिसाब लेंगे (Video)

ठाणे / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी कल्याण दौर्‍यावर येत आहेत. उल्हासनगर येथे आयोजित एल्गार परिषदेत उपस्थित राहणार आहेत. पक्षाचा ताबा आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच पवार हे कल्याण येथे येत आहेत. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी अ‍ॅक्टिव्ह झालेली पहायला मिळत आहे. नुकतेच उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे येथे येऊन गेले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार हे देखील येथे येऊन सत्ताधार्‍यांवर काय नक्की बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उद्या म्हणजे 12 तारखेला संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण पश्‍चिमेत येणार आहेत. विविध विकास कामाची उद्घाटने करणार आहेत. त्यामुळे आजी आणि माजी मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS