पुणे/प्रतिनिधी ः वेगवेगळ्या वेळी नवनवीन राजकीय भूमिका घेऊन महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात शरद पवार यांनी कायम स्वत:भोवती संशयाचे वातावरण निर्म
पुणे/प्रतिनिधी ः वेगवेगळ्या वेळी नवनवीन राजकीय भूमिका घेऊन महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात शरद पवार यांनी कायम स्वत:भोवती संशयाचे वातावरण निर्माण केले, असे म्हटले जाते. अशा खासदार शरद पवारांनी संगीत संशयकल्लोळ या नाटकाचा आस्वाद घेतला. त्याविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहे. दरम्यान, मराठी संगीत रंगभूमीबद्दल ज्याकाळी चिंता वाटावी अशी स्थिती होती त्याकाळी या रंगभूमीविषयी आस्था असलेल्या शिलेदार कुटुंबातील दोन पिढ्यांनी अतिशय कष्ट करून मराठी संगीत नाटक रंगभूमीच्या पुनरुज्जीवनासाठी स्वत:ला वाहून घेतले. असे पवार म्हणाले. गंधर्वभूषण जयराम शिलेदार, जयमालाबाई आणि त्यांच्या कन्या लता तसेच कीर्ती यांनी आपल्या कलेद्वारे रसिकांच्या मनावर राज्य केले. युवा पिढी संगीत रंगभूमीकडे वळत आहे हे पाहून संगीत रंगभूमीची ऊर्जितावस्था पुन्हा पाहावयास मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जयराम शिलेदार आणि जयमालाबाई शिलेदार यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्टतर्फे संगीत नाट्यमहोत्सवाचे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन करण्यात आले होते.
COMMENTS