Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवपाणंद शेतरस्त्यांसाठी पेरू वाटप आंदोलन करू ः शरद पवळे

सुपा ः महाराष्ट्रात शेतरस्त्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपच्या घटना वाढत चालल्या आहेत. भावाभावात, शेतकर्

शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा जाहीर करा
रामगिरीजी महाराजांसह संत कौस्तुभ आणि स्वप्ना जाधव नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित
BREAKING: पीपीई किट घालून मर्डर … बॉडी फेकली हायवे जवळच्या जंगलात | पहा Lok News24

सुपा ः महाराष्ट्रात शेतरस्त्यांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपच्या घटना वाढत चालल्या आहेत. भावाभावात, शेतकर्‍यांमध्ये आपापसात मोठे वाद निर्माण झाले असून भविष्यात निर्माण होणारा अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ उभी केली असून शेतकर्‍यांना शेत तिथे रस्ता मिळून देवुन शेवटच्या शेतकर्‍याला न्याय देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचा इशारा शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी दिला आहे.
जिल्हयात शिवपानंद शेतरस्त्यांच्या नंबरींचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणार्‍यांना दंड सुरू करा,जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत,समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा,चालू वहीवाटीच्या प्रत्येक शेतरस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत, शेतरस्ते बंद करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक 8247 /2023 रोजीच्या निकालानुसार 60 दिवसांत शेत रस्ते खुले करा, नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा, तहसीलसह प्रशासकीय कार्यालयामध्ये येणार्‍या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा, शिवपानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्‍चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतस्ते करा, मुख्यमंत्र्यांसह संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शेतरस्त्यांसाठी पाठपुरावा करूनही न्याय न मिळालेने 18 डिसेंबर रोजी अहमदनगर जिल्हाधिकार्यालयावर शेतकर्‍यांच्या वतीने पेरू वाटप आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले असून याच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. राधाकृष्ण विखे पाटील ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, पोलिस अधिक्षक अहमदनगर यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, संदीप कोल्हे, संदीप मावळे, भाऊसाहेब वाळुंज , दशरथ वाळुंज, विठ्ठल शिंदे, होशीराम कुंदन, संजय साबळे, दत्तात्रेय पवार, रामदास लोणकर,विशाल सोनवणे, प्रविन गायकवाड, उद्धव कुलट, पंढरीनाथ गाडगे, सुनिल गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS