Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक ग्रामीण भागात शांतिगिरीजी महाराजांचा झंझावती प्रचार दौरा 

बाबाजींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद..

नाशिक प्रतिनिधी - निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्म पिठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित समर्थ सदगुरू स्वामी शांतीगिरीजी म

परमपूज्य शांतिगिरीजी महाराजांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा जय बाबाजी परिवाराचा निर्धार 
जय बाबाजी भक्त परिवार शांतिगिरीजी महाराजांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरविणार  
नाशिक शहर व सिन्नर येथे विविध ठिकाणी शिवजयंती निमित्त शांतिगिरीजी महाराजांनी केले शिवपूजन 

नाशिक प्रतिनिधी – निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्म पिठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित समर्थ सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा नाशिक ग्रामीण भागात झंझावती प्रचार दौरा नुकताच संपन्न झाला.यावेळी गावोगावी बाबाजींचे फटाक्यांच्या अतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले.आणि राजकारणाच्या शुद्धीकरण मोहिमेस  प्रत्येक गावात नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

  जय बाबाजी भक्त परिवाराच्या व नागरिकांच्या आग्रहाखातर राजकारणाचे शुद्धीकरण आणि देशसेवेसाठी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.जनता जनार्दनांच्या निष्काम सेवेच्या प्रमुख अजेंड्यावर बाबाजी निवडणूक लढवत असल्याचे भक्त परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.बाबाजींनी नाशिक ग्रामीण मधील गिरणारे, वाडगाव,दाबडगाव,नाईकवाडी, लाडची,साडगाव,धोंडेगावं, गाळोशी पाडा,देवरगाव,नागलवाडी,दूगाव, मुंगसारेगाव,दरी गाव,मातोरीगाव आदींसह विविध गावात झंझावती प्रचार दौरा संपन्न झाला.नागरिकांनी जागोजागी बाबाजींचे जंगी स्वागत केले.आणि आजची दलबदलू राजकीय परिस्थिती पहाता बाबाजींच्या राजकारणाच्या शुद्धीकरण मोहिमेस नागरिकांनी स्वयंम स्फुर्तीने मोठा प्रतिसाद दिला. यावेळी शांतिगिरीजी महाराजांच्या दर्शनासाठी गावोगावी नागरिकांनी मोठी गर्दी केली. बाबाजींच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.नागरिकांनी स्वखर्चाने गाडीत डिझेल-पेट्रोल टाकत,घरचा जेवणाचा डब्बा घेऊन निष्काम भावनेतून देशहितासाठी प्रचार ताफ्यात सहभागी होऊन गावागावातील हनुमान मंदिरात दर्शन-पूजन करत बाबाजींचा प्रचार केला.यावेळी विष्णू महाराज यांनी आपल्या खास शैलीत बाबाजींची  राजकारणात येण्याची निष्काम भावना उपस्थितांना समजावून सांगितली.

COMMENTS