कर्नाटकात राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्नाटकात राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक

बेंगळुरू : कर्नाटकात भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यावर एका व्यक्तीने शाई फेकल्याचे समोर आले आहे. राकेश टिकैत हे पत्रकार प

ठाकरेंनी चर्चा न करता राजीनामा दिला
भाजपची सत्ता जाताच बिहारमध्ये सीबीआय सक्रीय
विद्यार्थी, शिक्षकांनी अंधश्रद्धेचा त्याग करावा : डॉ.सप्तर्षी

बेंगळुरू : कर्नाटकात भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यावर एका व्यक्तीने शाई फेकल्याचे समोर आले आहे. राकेश टिकैत हे पत्रकार परिषदेत बोलत असताना एका व्यक्तीने त्यांच्याजवळ जाऊन काळी शाई फेकली. शाई फेकल्यानंतर त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. या घटनेनंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना राकेश टिकैत यांनी हे सरकारचे षडयंत्र असल्याचे म्हटले. “येथे स्थानिक पोलिसांनी कोणतीही सुरक्षा पुरवलेली नाही. हे सरकारच्या संगनमताने झाले आहे. सुरक्षेची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर आहे.” असा आरोप यावेळी राकेश टिकैत यांनी केला.

COMMENTS