Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दि फ्रेंड्स ऑफ डिप्रेस्ड लीग संस्थेस ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार’

शेवगाव तालुका ः महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या सामा

थकीत कर्ज वसुलीसाठी घर सील
नोएडातील ट्वीन टॉवर पाडले राव,
भगवान महावीर जयंतीनिमित्त उद्या अहिंसा बाईक रॅली

शेवगाव तालुका ः महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या सामाजिक संस्थांना दिले जाणारे सर्वोच्च प्रतिष्ठेचे सन 2022-23 चे ‘शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक’ आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातील ‘दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग, शेवगाव या संस्थेला नुकतेच जाहीर झाले. याबाबत 7 मार्च 2024 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याने संस्थेच्या संचालक मंडळाने व कर्मचार्‍यांनी आनंद व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामुळे महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या संस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून मा. मुख्यमंत्री तथा मा. मंत्री सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीकडून पारितोषिकासाठी संस्थेची निवड केली जाते. रुपये सात लाख पन्नास हजार, सन्मानपत्र, मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल स्मृतीचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप असून ते 12 मार्च 2024 रोजी मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे. दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग, शेवगाव ही संस्था सन 1933 पासून शैक्षणिक व सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या संस्थेची स्थापना कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी केली असून या संस्थेच्या वतीने विविध शैक्षणिक शाखा व सामाजिक न्याय खात्यांतर्गत  11 वसतिगृहे चालविले जात आहेत.  अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रयोगशील व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळख असणार्‍या या संस्थेचे अ‍ॅड. डॉ. विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे व अहमदनगर जि. प.माजी सभापती हर्षदा काकडे हे नेतृत्व करीत आहेत. या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. विद्याधर काकडे यांनी सांगितले की, संस्था विविध स्वरूपात समाजसेवेचे काम करीत आहे. तसेच संस्थेच्या वतीने चालविल्या जाणार्‍या सर्व वसतिगृहाना संत गाडगे महाराज यांचे नाव असून गेल्या पाच- सहा दशकापासून त्यांच्या विचारावर ही संस्था मार्गक्रमण करीत आहे. माणसालाच देव समजून ग्रामीण भागातील व गोरगरिब विद्यार्थ्यांची मनोभावे सेवा या वसतिगृहाच्या माध्यमातून केली जात आहे. संस्थेच्या वसतिगृह विभागाचे प्रमुख रामेश्‍वर पालवे, रवींद्र कुटे व संजय भवर, सर्व अधीक्षक व कर्मचारी, संस्थेच्या विश्‍वस्त सौ. हर्षदा काकडे, पृथ्वीसिंग काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ व त्यांचे इतर सहकारी समर्पण भावाने काम करीत आहेत. त्याचेच फळ म्हणून हा पुरस्कार संस्थेला मिळत आहे. या पुरस्काराने आम्हाला काम करण्यास अधिक उर्जा मिळेल असा विश्‍वास व आनंद वाटत आहे.

COMMENTS