नाशिक- रयतेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न मानता कार्य करणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक न्यायासाठी असलेले का

नाशिक– रयतेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न मानता कार्य करणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक न्यायासाठी असलेले कार्य आजच्या पिढीला दिशादर्शक आहे, असे उदगार पळसे येथील ग्रामाभिमान मंचचे अध्यक्ष प्रमोद गायधनी यांनी काढले.
पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन म्हणजेच सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील बर्वे, ग्रामाभिमान मंचचे सचिव सुनील आगळे, प्रा.प्रदीप गायधनी, भारतीय सेनेतील जवान संदीप म्हस्के, सोहम गायधनी, ज्येष्ठ शिक्षक अरुण पगार मंचावर उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर ईश्वरी आडके, वेदिका आडके, चैताली आडके या विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. मानसी वाकचौरे, धन्वंतरी गायधनी आणि सहकारी यांनी गीत सादर केले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक कैलास लहांगे यांनी सूत्रसंचालन केले.
COMMENTS