Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाहू महाराजांची सामाजिक समतेची शिकवण ही काळाची गरज

प्रा. प्रकाश गावित यांचे प्रतिपादन

शेवगाव तालुका ः येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून  इतिहास विभागाने विशेष व्याख्यानाचे आयोजन केले. या प्रसंगी टाकळ

अखेर वंचितंच्या बोंबाबोंब आंदोलनाची दखल ः अँड. डॉ. अरुण जाधव
देवळाली प्रवरा शाळेत आंनद मेळावा उत्साहात
काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांचे निधन

शेवगाव तालुका ः येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून  इतिहास विभागाने विशेष व्याख्यानाचे आयोजन केले. या प्रसंगी टाकळी ढोकेश्‍वर येथील श्री ढोकेश्‍वर महाविद्यालयातील इतिहासविभागातील प्रा. प्रकाश गावित यांनी ‘छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कर्तुत्व’ या विषयावर व्याखान दिले. यावेळी त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची सामाजिक समतेची शिकवण ही काळाची गरज आहे आणि भूतकाळातील शाहू महाराजांचे विचार आज वर्तमान काळाला अतिशय प्रेरणादायी आहे ते आपल्याला महत्त्वपूर्ण संदर्भ देऊन जातात असे मत आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रा. गावित यांनी मांडले.
शाहू महाराजांचे विचार समाजाला दिशादर्शक आहेत  असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पुरुषोत्तम कुंदे यांनी मांडले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.युवराज सुडके, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब आडसरे तसेच या कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनीही श्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय इतिहास विभाग प्रमुख डॉ. संदीप मिरे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मफीज इनामदार यांनी केले तर आभार प्रा. वांडेकर यांनी मानले.

COMMENTS