Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाहू महाराजांना विशालगडावर जाण्यापासून रोखले

कोल्हापूर :  कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील हे विशाळगडाच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी त्यांना प्रशासनाने पांढरेपाण

सुट्या अन् सवलतीमुळे बस हाउसफुल
कोल्हापूर, सातार्‍याला मुळसाधार पावसाचा फटका
शहा वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राच्या लिंक लाईनचे काम पूर्ण : आ.आशुतोष काळे

कोल्हापूर :  कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील हे विशाळगडाच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी त्यांना प्रशासनाने पांढरेपाणी येथे रोखले. जमावबंदी लागू असल्याने शाहू छत्रपती यांना रोखण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी यावेळी पत्रकारांची देखील अडवणूक केली. पत्रकारांवर काठी उगारली असल्याची माहिती आहे. सतेज पाटील यांनी किमान 15 लोकांना विशाळगडावर जाऊ देण्याची मागणी केली आहे. विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील शाहू छत्रपती यांनी केली होती

COMMENTS