मुंबई प्रतिनिधी - शाहरुखच्या जवानची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. यावर्षीच्या जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता

मुंबई प्रतिनिधी – शाहरुखच्या जवानची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. यावर्षीच्या जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानं तब्बल हजार कोटींची कमाई केली होती. आता त्याचा जवान हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे. तीन दिवसांपूर्वी जवानचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याला किंग खानच्या चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. जवानच्या अॅडव्हान्स बुकींगलाही चाहत्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. अशातच शाहरुखबाबत एक मोठी बातमी समोर आली असून त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानची लेक, सुहाना खान झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ या Netflix वरील चित्रपटातून पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. तिचं हे पदार्पण फक्त छोट्या पडद्यापुरतं मर्यादित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सुत्रांनुसार सुहाना आपल्या वडिलांसोबत चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. कहानी २’ आणि ‘बदला’ सारख्या दमदार चित्रपटांसाठी ओळखला जाणारा सुजय घोष त्याचा नवीन चित्रपट शाहरूख आणि सुहाना सोबत करण्यास तयार असल्याचं यापूर्वीच उघड झालं होतं. पण आता एका वृत्तानुसार किंग खान आणि त्याची लाडकी लेक हे एका चित्रपटामध्ये दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूखची भूमिका फक्त कॅमिओ म्हणून मर्यादित राहणार नसून ,’डियर जिंदगी’ मध्ये साकारलेल्या भूमिकेसारखी असणार आहे. असं म्हटलं जात आहे की, सुजयचा चित्रपट एक स्पाय थ्रिलर असून त्यात सुहाना गुप्तहेराच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रत्येक गुप्तहेराला एका मदतनीसाची गरज असते आणि ही भूमिका इतर कोणी नाही तर स्वतः शाहरूख साकारणार आहे. या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शन ला सुरूवातही झाली आहे. दरम्यान, सुहाना ‘द आर्चिज’ च्या रिलिजबद्दलही कमालीची उत्सुक आहे. यासगळ्यात मात्र चर्चा आहे ती शाहरुखच्या जवानची. त्याचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ७ सप्टेंबरला देशभरामध्ये प्रदर्शित होणार आहे
COMMENTS