Homeताज्या बातम्यामनोरंजन

अपघातानंतर शाहरुख खान मायदेशी परतला

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान बादशाह शाहरुख खान सध्या बराच चर्चेचा विषय ठरला. नुकताच त्याचा एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे. अमेरि

सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला शाहरुख खानने केली धक्काबुक्की
‘डंकी’ सिनेमाआधी शाहरुख खान वैष्णो देवी चरणी
शाहरुख खानने अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांची महिलांची घेतली भेट

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान बादशाह शाहरुख खान सध्या बराच चर्चेचा विषय ठरला. नुकताच त्याचा एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे ही दुर्घटना घडलीय. शाहरुख खानच्या नाकाला दुखापत झाली असून एक छोटी सर्जरी लागल्याने चाहत्यांना किरकोळ धक्का बसला आहे. तरी काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. अपघातानंतर अभिनेता मुंबईत परतला आहे. लाॅस एंजेलिसमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, शाहरुख खानच्या नाकाला दुखापत झाली आहे. ज्यामुळे त्याला किरकोळ शस्त्रक्रिया करायला लागली आहे. दुखापतीमुळे त्याच्या नाकातून रक्त येऊ लागल्याने डॉक्टरांनी किरकोळ ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. नुकताच बुधवारी सकाळी अर्थात आज सकाळी शाहरूख मुंबईत परतला आहे. अपघातानंतर लाडक्या अभिनेत्याला पाहिल्यानंतर चाहते खूपच खुश झाले आहेत. शाहरूख आज सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट झाला आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ने सोशल मीडियावर शाहरूखच्या काही व्हिडिओ शेअर केल्या आहेत. ज्यात शाहरुखची अपघातानंतर पहिली झलक पाहिल्यानंतर चाहते आनंदित झाले आहेत. शाहरुखला बुधवारी सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आला. विमानतळावरील फोटो मध्ये तो तंदुरुस्त आणि उत्तम दिसत होता. पापाराझींनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत.

COMMENTS