Homeताज्या बातम्यामनोरंजन

शाहरुख खानला राजस्थातून अटक

पुणे ः पुण्यातील शासकीय अधिकार्‍यांचे बनावट अकाउंट बनवून फसवणूक करणार्‍या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राज

वैष्णोदेवीनंतर शाहरुख खान साईबाबांच्या नगरीत दाखल
‘डंकी’ सिनेमाआधी शाहरुख खान वैष्णो देवी चरणी
अपघातानंतर शाहरुख खान मायदेशी परतला

पुणे ः पुण्यातील शासकीय अधिकार्‍यांचे बनावट अकाउंट बनवून फसवणूक करणार्‍या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह देशातील इतर शासकीय अधिकार्‍यांच्या नावाने आरोपीने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले होते. शाहरुख खान असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे सायबर पोलिसांनी त्याला राजस्थानमधून अटक केली आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. फिर्यादींना पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुक रिक्वेस्ट आली होती. राजेश देशमुख बोलत असल्याचे भासवून त्यांचा मित्र संतोष कुमार, सीआरपीएफमध्ये कार्यरत असून त्यांचे जुने फर्निचर कमी किंमतीत विकत असल्याचे सांगून त्याने 70 हजार रूपये उकळले होते.

COMMENTS