Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासेतील महसूल खात्याचा सावळा गोंधळ

तलाठ्याने मुळ नाव वगळून नवीन नाव घातल्याचा शेतकर्‍याचा आरोप

माका ः नेवासे तालुक्यातील तहसील कार्यालया अंतर्गतच्या महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतीसंबधीच्या सातबारा उतारर्‍यात मूळ शेतकर्‍यांचे नाव वगळून

माझा दोष नाही…माझी फसवणूक झाली…मला माफ करा…
आदिवासी महिलेला शिवीगाळ करणार्‍या पोलिसावर कारवाई
पोलिसांनी दखल घेतली आणि मुलीची सुटका झाली…

माका ः नेवासे तालुक्यातील तहसील कार्यालया अंतर्गतच्या महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतीसंबधीच्या सातबारा उतारर्‍यात मूळ शेतकर्‍यांचे नाव वगळून नवीन नाव घातले असून, शेतजमिनीची उतार्‍यातून परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या फेरबदलामुळे शेतकर्‍यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच सध्यातरी लोक सभा निवडणूक प्रक्रियेमुळे मुळ शेतकरी विठ्ठल येसु माने यांने माहिती अधिकार कायदा 2005 नुसार महसूलच्या कार्यालयास याबाबत माहितीची मागणी केली आहे.                                            
यासंदर्भात असे की, मौजे पांचुदे येथील शेतकरी विठ्ठल येसु माने यांचे नावे असलेली गट.नं 33 मधील 74 आर शेतजमीन वि.वि.सेवा सहसोसायटीचे तीन ते चार लाख रूपयांचे कर्ज माने याच्या नावे असताना तलाठी मलदौंडे यांनी स्वत: पैसे (लाच)च्या माध्यमातून सोनाबाई गंगाधर वाघमोडे रा. पांचुदे यांच्या नावे केली असल्याचा आरोप पत्र तसेच माहीतीची मागणी तहसील कार्यालयाकडे दाखल केली असून, याबाबत याअगोदर तलाठी कार्यालयास विचारणा केली असता, तलाठी मलदौंडे यांनी अरेरावी भाषा केली असल्याचे माने यांनी सांगितले आहे. सध्या तरी संबधित शेतकरी माने लोकसभा निवडणुका प्रकीयेकारणास्तव माहिती अधिकार कायदा न्यायाच्या प्रतिक्षेची वाट पहात असून या गोंधळामुळे शेतकरी वर्गातुन मोठ्या प्रमाणात संतप्त व्यक्त केला जात आहे.

पाचुंदे, देडगाव, कुडगाव या तिन्ही गावच्या महसूलच्या शेती संबधित (मालक) अधिकारी तलाठी मल दौंडेनी माने कुटुंबाची शेतजमीन गावातीलच वाघमोडे कु टुंबीयांच्या नावे लाच खाऊन केलीच कशी याबाबत विचा रणा केल्यासं दमदाटी करून पोलिसगुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात आहे.यासंबंधी सध्यातरी निवडणू क प्रक्रिया सुरु असल्याने, शांत आहोत त्यानंतर देडगावच्या कार्यालयासमोर माझे कुटुंब व सहकारी वर्ग याबाबत कुठल्याच शासकीय कार्यालयासं निवेदन न देता आमरण उपोषणास बसणार आहोत. विठ्ठल येसु माने, पिडीत शेतकरी, रा.पाचुंदे तालुका नेवासा    

COMMENTS