Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस सेवादलाच्या तालुकाध्यक्षपदी शब्बीर शेख

कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकत वाढविण्यासाठी आणि काँग्रेसची ध्येय धोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी व

जैविक इंधनावर चालणारा किफायतशीर ड्रोन विकसित करावा ; केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी
शिर्डीत 271 मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करून योग्य दिशेने मार्गक्रमण करावे – भटनागर

कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकत वाढविण्यासाठी आणि काँग्रेसची ध्येय धोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी सेवादल विभागाचे अध्यक्ष पदी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते शब्बीर शेख यांची निवड करण्यात आली.
शब्बीर शेख यांची कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी सेवादल विभागाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र नागवडे, तालुका अध्यक्ष आकाश नागरे, किसान काँग्रेस विभागाचे तालुकाध्यक्ष विष्णु पाडेकर, महिला काँगेस अ.जा. विभागाच्या जिल्हा अध्यक्ष सविता विधाते,कोपरगाव तालुका सरचिटणीस रवींद्र साबळे, राहुल गवळी, रौनक अजमेरे, विजय मोरे, आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. काँग्रेस पक्ष वाढीसाठी खेड्यापाड्यात जाऊन काम करणार असल्याचे शब्बीर शेख यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS