Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बौद्ध संस्कार संघाच्या वतीने वर्षावासास शुभारंभ

अहमदनगर/प्रतिनिधी ः बौद्ध धर्मात अतिशय महत्वाच्या असलेल्या आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावासाचा शुभारंभ करण्यात येतो. अहमदनगर शहरातील बौद्ध संस्कार स

तालुक्याच्या सर्वांगीण विकास वाटचालीत भक्कम उभे राहा – आमदार थोरात
भंडारदरा व मुळा धरणातून गावबंधारे भरून द्या
ठेकेदारांच्या आंदोलनामुळे मनपाची विकासकामे ठप्प

अहमदनगर/प्रतिनिधी ः बौद्ध धर्मात अतिशय महत्वाच्या असलेल्या आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावासाचा शुभारंभ करण्यात येतो. अहमदनगर शहरातील बौद्ध संस्कार संघाच्या वतीने तपोवन रोड येथे आषाढ पौर्णिमेनिमित्त सोमवारी वर्षावासाचा शुभारंभ त्रिशरण पंचशील, बुद्ध वंदना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म या पवित्र ग्रंथाच्या वाचनाने सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी दरवर्षी 4 महिने वर्षावास कालखंडात आपल्या निवासस्थानी प्रत्येक उपासाकडून एक वर्ष कार्यक्रम घेण्यात येतात. यावेळी दत्तात्रय शिरसाठ, प्रा. दिलीप गायकवाड, प्रा. विश्‍वासराव कांबळे, प्रा. डॉ सुरेखा गांगुर्डे, मुक्ताबाई मोरे, डी. सी. तरकसे, प्रा. विलास साठे, वैशाली अवचर, साहेबराव गायकवाड, प्रल्हाद साठे, संजीव घोडके, बाबासाहेब भांबळ, खरात,  अरविंद शिंदे, उषा साळवे, सोपानराव विधाते आदी यावेळी उपस्थित होते. वंदना झाल्यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म या एकमेव पवित्र  ग्रंथातील खंड दुसरामधील बुद्धांनी परिवारजकांना जे पहिले प्रवचन दिले या प्रकरणाचे वाचन प्रतिभाताई देठे यांनी केले. परिवारजकांची प्रतिक्रिया या प्रकरणाचे वाचन कल्पनाताई कांबळे यांनी केले. वाचन केलेल्या प्रकरणावरती भाऊसाहेब देठे यांनी विश्‍लेषण केले. तसेच उपस्थित माया गोरे, घावटे, उगल मोगले, विक्रम देशमुख, महाजन, होन,जाधव, कोठुळे, डमाळे, बुधवंत, महेश गायकवाड इत्यादी परिवाराने सहभागी होऊन धम्माचे श्रवन केले. या पवित्र ग्रंथाचे केवळ वाचन न करता त्याचे चार महिने विश्‍लेषण आणि चर्चा वर्षावास कालखंडात  28 ऑक्टोबर अश्‍विन पौर्णिमेपर्यंत होणार आहे.

COMMENTS