पुणे : गेल्या काही महिन्यापूर्वी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर एका तरूणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर असतांनाच शहरातील कोंढवा परिसरातील ए
पुणे :
गेल्या काही महिन्यापूर्वी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर एका तरूणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर असतांनाच शहरातील कोंढवा परिसरातील एका 25 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणार्या या तरूणीवर अज्ञात इसमाने अत्याचार केला.
कुरिअर बॉस असल्याची बतावणी करून हा तरूण घरात शिरला, त्यानंतर त्याने स्प्रे मारल्यानंतर तरूणीला बेशुद्ध करून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी कीर, कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणार्या 25 वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात इसमाने अत्याचार केला.
कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. आरोपीने स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेच कुरिअर आहे असे सांगितले, त्यानंतर जबरदस्तीने घरात शिरून तिच्यावरती बलात्कार केला. पोलिसांच्या 10 टीम त्याचा तपास करत आहे. तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहते. तरुणी मूळची अकोल्याची आहे.
ती पुण्यातील कल्याणी नगरमधील कंपनीत काम करते अशी माहिती देखील पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान आरोपीने सोसायटीमध्ये जाण्यासाठी स्वत:ला कुरिअर बॉय असल्याचे सांगितले होते.
दरवाज्यावर पोहोचल्यावर त्याने पीडित महिलेला बँकेच कुरिअर आहे असे सांगितले होते, मात्र तरूणीने ते आपले नसल्याचे सांगितले, पण त्याने त्यावर सही करावी लागेल असे सांगितल्याने तरूणीने सेफ्टी डोअर उघडला, त्याचवेळी आरोपीने तरूणीच्या तोंडावरती केमिकल स्प्रे मारला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एका गार्डेड सोसायटीमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. ही घटना उच्चभ्रू व सुरक्षित मानल्या जाणार्या सोसायटीत घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठे प्रश्न उपस्थित झाले आहे. आरोपीने अतिशय हुशारीने कुरिअर बॉयचे भान ठेवत गेट पार केला.
सुरक्षारक्षकांकडून त्याची फारशी चौकशी झाली नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपीचे ओळख पटवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.


COMMENTS