पुणे/प्रतिनिधी ः घरा शेजारी राहणार्या अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका 28 वर्षीय तरुणीविरुद्ध कोंढवा पोलिसांत गुन्ह

पुणे/प्रतिनिधी ः घरा शेजारी राहणार्या अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका 28 वर्षीय तरुणीविरुद्ध कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, तरुणीवर भादंवी कलम 506 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलगा आणि तरुणी एकमेकांच्या शेजारी राहतात. पीडित मुलगा (वय 18) हा अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तरुणीने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. माझ्याशी शारिरिक संबंध ठेव नाहीतर, तु माझ्यावर बलात्कार केला, अशी खोटी तक्रार पोलिसांकडे देईल, अशी धमकी अल्पवयीन मुलाला तरुणीने दिली. त्यानंतर तरुणीने अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने धमकावून त्याची इच्छा नसतांना देखील त्याच्याशी दोन ते तीन वेळा शारीरिक संबंध केले. तक्रारीनुसार, शारीरिक संबंधावेळी अल्पवयीन मुलाला मोबाइल कॅमेर्याद्वारे याचे चित्रीकरण करण्यास तरुणीने सांगितले. तरुणीच्या सततच्या धमक्यांमुळे अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलिस ठाण्यात आरोपी तरुणीविरोधात तक्रार दिली. हा प्रकार मे 2021 ते नोव्हेंबर 2022 यादरम्यान घडला आहे. याबाबत तक्रारदार याने उशिराने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याने गुन्हा विलंबाने दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस बाबर पुढील तपास करत आहेत.
COMMENTS