Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नक्टीच्या लग्नाला सतरा इग्न. राष्ट्रीय महामार्गाचे काम काही होईना

किनवट प्रतिनिधी - रेणुका मातेच्या पावन भूमीत मोठ्या थाटामाटात गाजावाजा करून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी सहा वर्षांपूर्वी

अहंकारी लोकप्रतिनिधींना मतदारांनी जागा दाखवावी
वाळू भरून जाणार्‍या हायवे टिप्परवर धाडसी पोलिसांची कारवाई
माजी खासदार उल्हास पाटील भाजपच्या वाटेवर ?

किनवट प्रतिनिधी – रेणुका मातेच्या पावन भूमीत मोठ्या थाटामाटात गाजावाजा करून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी सहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग 161- या रस्त्याचे नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले होते. तब्बल अर्ध्या दशकाहून जास्त काळ उलटून गेला तरी अद्यापही धनोडा -माहूर -किनवट -कोठारी- चिखली इस्लापूर रस्ता पूर्ण होऊ शकला नाही .ही अतिशय राजकारणासाठी लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. किनवट -माहूर तालुक्याचा वनवास काही संपता संपेना. या रस्त्यावरून कित्येक प्रवाशांची जीवे गेलीत कमरा खिळखिळ्या झाल्या हाडे मोडली मणक्यात गॅप पडला परंतु मुर्दाड अधिकार्‍यांना किंचितही लाज वाटू नये ही अतिशय शरमेची गोष्ट आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
राष्ट्रीय महामार्ग निर्माण समितीची स्थापना झाली. पण तेही वांझोटीच निघाली. तिलाही फळ निष्पत्ती झालीच नाही. स्थानिक पुढार्‍यांना याचे काही देणे घेणेच नाही निवडणुका तोंडावर आल्या की आपले थोबाड घेऊन मताचा जोगवा मागत घरोघर वाडी तांड्यावर फिरतील. परंतु आज या रस्त्याच्या निष्काळजीपणामुळे कित्येकांचे संसार उध्वस्त झाले याची त्यांना काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. यावेळी जनता मात्र इंगा दाखविल्याशिवाय राहणार नाही अशी खोचक प्रतिक्रिया शहरात उमटू लागली आहे. वनविभागाच्या परवानगी न मिळाल्याने सारखणी लोणी धानोरा घाटाचे भिजत घोंगडे कायम असतानाच लोणी घाटात आहे त्याच रस्त्यावर डांबरीकरणाचा लेप मारून कामे घाईगडबडीने आटोपण्याचा प्रयत्न चालू आहे प्रवाशांची संभाव्य गैरसोयीचे त्यांना काही सोयर सुतक नाही. अरुंद वळणावर वेगाने धावणार्‍या वाहनाचे अपघात भविष्यात वाढवून हा रस्ता डोकेदुखी ठरणार आहे. घाट कटिंग च्या नावाखाली आहे त्या रस्त्यावर मलम पट्टी करून कामाचा निपटारा करणार्‍यांना किनवट कर काही भूमिका घेणार का. एकीकडे वन विभागाची परवानगी नाही तर दुसरीकडे किनवट माहूर तालुक्यातील स्टोन क्रेशर ला दगड फोडून ब्लास्टिंग करण्याची परवानगी कोणी दिली हा ही पर्यावरण वाद्यांना पडलेला प्रश्नच आहे. किनवट माहूर तालुक्यातील बर्‍याच स्टोन क्रेशर चालकाकडे आपली स्वतःची खानपट्टेच नाही असे असतानाही स्टोन क्रेशर चालक स्टोन कुठून आणत आहे आणि क्रश करून पाहिजे त्यास रात्रंदिवस उपलब्ध करून देत आहे. मग यांना कोणत्या विभागाने परवानगी दिली हाही वन प्रेमी कडून  प्रश्न उपस्थित होत आहे.

COMMENTS