Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सात नंबर पाणी मागणी अर्ज मुदतीत दाखल करावे

आमदार आशुतोष काळे यांचे शेतकर्‍यांना आवाहन

कोपरगाव ः गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी खरीप हंगाम सन 2024-25 साठी खरीप पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रस

लाडक्या बहिणींचे पैसे कर्ज खात्यात जमा करू नका
लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात
कोपरगाव शहरातील 323 कोटीच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी

कोपरगाव ः गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी खरीप हंगाम सन 2024-25 साठी खरीप पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले असून चालू खरीप हंगामातील पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून डाव्या-उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर शेतीसाठी पाणी देण्यात येणार आहे. गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज मुदतीच्या आत पाटबंधारे खात्याच्या संबंधित शाखा कार्यालयाकडे आपले पाणी मागणी अर्ज जमा करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आ.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, धरण क्षेत्रात सातत्याने पडत असल्यामुळे पावसामुळे धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा असुन नांदूर मध्यमेश्‍वर बंधार्‍यातून गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने जवळपास आठ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. परंतु कोपरगाव मतदार संघात व गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत तर दुसरीकडे पाणी पुरवठा योजनांचे जलाशय तळ गाठू लागले आहेत. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना  देखील उशिराने पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे तातडीने ओव्हर फ्लोच्या पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्याच्या सूचना करून सध्या पिण्यासाठी आवर्तन सुरु आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे अत्यल्प पावसावर शेतकर्‍यांनी केलेली खरीप पिके दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र पाऊस काही पडत नाही.धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळावे यासाठी सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनानंतर खरीप पिकांना जीवदान मिळावे यासाठी पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाकडून खरीप पिकांसाठी आवर्तन देण्यात येणार आहे. त्यासाठी लाभधारक शेतकर्‍यांनी सात नंबर अर्ज भरणे आवश्यक असून आपले अर्ज दि.12 ऑगस्ट पर्यंत संबंधित शाखा कार्यालयाकडे भरणे आवश्यक आहे. पावसाने दिलेली ओढ पाहता खरीप पिकांचे नुकसान होवू नये यासाठी जास्तीत जास्त लाभधारक शेतकर्‍यांनी आपले पाणी मागणी अर्ज दाखल करावे व सर्व पाणी पुरवठा योजनांचे जलाशय भरून घ्यावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

COMMENTS