Homeताज्या बातम्यादेश

भाविकांच्या बसला अपघात सात जणांचा मृत्यू

नवी दिल्ली ः वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या बसला झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री

उत्तरकाशीत बस दरीत कोसळली, ७ जण ठार तर 28 जण जखमी
टँक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात
बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

नवी दिल्ली ः वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या बसला झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. हा अपघात पंजाबमधील हरियाणाच्या अंबाला येथे ट्रक आणि मिनी बसमध्ये अपघात झाला. दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या समारास ही भीषण घटना घडली. त्यामध्ये, 25 जण जखमी झाल्याची माहिती असून पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छदेनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. तर, जखमींना जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील प्रवासी मिनीबसमधून वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जात होते. या प्रवासादरम्यान रस्ते मार्गावर मिनी बस आणि समोरुन येणार्‍या ट्रकची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. त्यामध्ये, मिनी बस चक्काचूर झाली असून 7 भाविक प्रवाशांचा मृ्त्यू झाला आहे. दरम्यान, या बसचा ड्रायव्हर दारु पिऊन बस चालवत होता, अपघातानंतर तो फरार झाल्याचं बसमधून प्रवास करणार्‍या प्रत्यक्षदर्शी शिवानीने सांगितले. तसेच, बसमधून 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते. रात्रीचा प्रवास असल्याने आमचा डोळा लागला होता, त्यामुळे नेमकी अपघाताची घटना कधी घडली हे समजले नाही, असेही शिवानीने म्हटले आहे

COMMENTS