वडूज / प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील वडूज येथील वडिलार्जित मालकी वहिवाटीच्या जमीनाचा अपहार करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सात जणांवर वडूज प

वडूज / प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील वडूज येथील वडिलार्जित मालकी वहिवाटीच्या जमीनाचा अपहार करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सात जणांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शिवशंकर कुशनचे मालक राजेश बाळकृष्ण चव्हाण, (वय 46, रा. वडूज) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
वैभव लक्ष्मणगिरी गोसावी (रा. करंजे तर्फ सातारा), दत्तात्रय निवृत्ती वाघ (रा. वावरहिरे ता. माण), आकाश बाळासाहेब गोडसे (रा. वडूज) व इतर चार जणांवर वडूज पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, फिर्यादी राजेश चव्हाण यांचे मयत वडील बाळकृष्ण जोतीराम चव्हाण यांच्या मालकीची वडूज ता. खटाव गावच्या हद्दीतील जमीन गट नंबर 449/8 या गटातील 27 आर क्षेत्र हे वडीलांच्या नावे असताना वैभव गोसावी याने त्यांचे नाव कमी करुन त्याचा बनावट 7/12 तयार करुन त्या जमीनीमध्ये हस्तक्षेप केला आहे. तसेच सदरचे क्षेत्र हे तक्रारदारांच्या परवानगी शिवाय भोगवटदार वर्ग दोनचे असताना ते भोगवटदार वर्ग 1 चे करुन दत्तात्रय वाघ यांचे लाभात कुलमुखत्यारपत्र करुन दिले आहे. तसेच त्यावेळेचे तत्कालीन तलाठी व सर्कल यांनी कागदोपत्राची खात्री न करता बाळकृष्ण जोतीराम चव्हाण हे मयत झाले असतानाही त्यांच्या मालकीच्या जमीन गट नंबर 449/8 मधील नाव कमी करुन अपहार केला आहे. तसेच तक्रारदार चांभार या जातीचे असल्याचे माहित असतानाही आकाश गोडसे याने त्यांना दमदाटी केली आहे. तसेच तक्रारदार वहिवाट करत
असलेल्या जमीनीवरती आकाश गोडसे याने शिवकृपा पंतसंस्थेचे कर्ज काढले आहे. याप्रकरणी तक्रारदार चव्हाण यांनी संशयितांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत व पोनि घनश्याम सोनवणे करत आहेत.

COMMENTS