कर्जत : कर्जत आणि जामखेड तालुक्यांच्या नागरिकांसाठी ऐतिहासिक क्षण आज आला आहे. उच्च न्यायालयाने अखेर या दोन्ही तालुक्यांसाठी सत्र न्यायालय स्था
कर्जत : कर्जत आणि जामखेड तालुक्यांच्या नागरिकांसाठी ऐतिहासिक क्षण आज आला आहे. उच्च न्यायालयाने अखेर या दोन्ही तालुक्यांसाठी सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता दिली असून, कर्जत येथे सत्र न्यायालय सुरू होण्याचा मार्ग आता आज मोकळा झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 1989 पासून सुरू असलेल्या संघर्षाला आज छत्तीस वर्षांनी यश आले आहे. असे कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट कैलास शेवाळे बोलताना म्हणाले.
सत्र न्यायालयाला मंजुरी मिळाल्याचे वृत्त समजताच, सोमवारी कर्जत येथील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. कैलास शेवाळे, उपाध्यक्ष, सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सर्व वकीलांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून, घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

COMMENTS