पुणे/प्रतिनिधी ः ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे हृदयविकाराच्या निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्या

पुणे/प्रतिनिधी ः ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे हृदयविकाराच्या निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. काही दिवसांपासून हरी नरके यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
हरी नरके यांच्या अचानक निघून जाण्याने समाजातील पुरोगामी विचार चळवळीला पोकळी निर्माण झाली आहे. हरी नरके यांच्या निधनाची बातमी कळताच साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. अनेक सामाजिक विषयांवर ते थेट भाष्य करत असतं. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणार्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला होता. त्यांचे अनेक लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले आहेत. फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे, त्याचबरोबर शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा होता. महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. याशिवाय राज्य सरकारने डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे 26 खंड प्रकाशित केले होते. यातील 6 खंडाचे संपादन हरी नरके यांनी केले होते.
हार्टऐवजी अस्थम्यावर उपचार; ’लीलावती’च्या डॉक्टरांवर आरोप – ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे बुधवारी निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकारावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. हरी नरके यांनी गत जून महिन्यात आपले मित्र प्रा. संजय सोनवणे यांच्याशी व्हॉट्स अपवर संवाद साधला होता. त्यात त्यांनी लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या तब्येतीकडे कसे अक्षम्य दुर्लक्ष केले, हे नमूद केले होते. त्याचे स्क्रीन शॉट सोनवणी यांनी फेसबुकवर शेअर केले आहे. सोनवणी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांचा 22 जून 2023 ला मला व्हॉट्सअॅप संदेश आला होता. “प्रिय भाऊ, नमस्कार, गुजरात जामनगर ला 3 आठवडे ट्रीटमेंट घेऊनपुण्यात घरी पोचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी ‘लो’ आहे. आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात 20 किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. ट्रीटमेंटमुळे 20 दिवसात 20 किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला. मात्र बीपी 60-90 असे ‘लो’ असून विकनेस खूप आहे. लीलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणे 10 महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या 4 थ्या स्टेजवर आलो होतो. जास्तीत जास्त 2 महिने लाईफ मिळाले असते. हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता. लीलावतीमधील नामवंत उरीवशेश्रेसळीीं, र्िीश्राळपेश्रेसळीीं खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिलेत त्यांनी. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चकले. लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला. हा लिलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे.. पण त्यांनी वाचलाच नाही.आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो 10 महिन्यात 21 पट झाला होता. आता बरा होतोय. माझा हसता खेळता ज्येष्ठ बंधू गेला. काय म्हणू?’’ असे सोनवणी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
COMMENTS