Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार स.म.कुलकर्णी यांचे निधन

कोपरगाव ः कोपरगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सदाशिव महिपती उर्फ स.म.कुलकर्णी (वय-90) यांचे बुधवारी पहाटे 05 वाजेच्या सुमारास

राहुरी तालुक्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
जामखेड तालूक्यात पाळला कडकडीत बंद
सधन व्यक्तींनी अन्नसुरक्षा योजनेतून बाहेर पडावे : तहसीलदार पाटील

कोपरगाव ः कोपरगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सदाशिव महिपती उर्फ स.म.कुलकर्णी (वय-90) यांचे बुधवारी पहाटे 05 वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. ते सतीष कुलकर्णी यांचे पिताश्री होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.स.म.कुलकर्णी हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व होते. त्यांचा जलसंपदा, महसूल आदी विषयात गाढा अभ्यास व मोठा जनसंपर्क होता. स्वाभिमानी पत्रकारितेचा व पत्रकारीतेच्या सुवर्णयुगाचे ते अखेरचे साक्षीदार होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. खंडकरी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचा व आकारी पडीत शेतकर्‍यांच्या त्यांचा मोठा अभ्यास होता.त्यांच्या काळात आमदार व खासदार आपल्या बातम्या वर्तमानपत्रात छापून याव्या म्हणून या पत्रकारांचे उंबरे झिजवत होते त्याचे ते साक्षीदार होते.त्यांच्यासह शं. पा. कपिले, टि. बी. मंडलिक आदी मंडळी ही तालुका पत्रकार संघाची संस्थापक होती. मात्र ते मंडलिक यांच्या नंतर तह्यात पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. त्यांनीच आपल्या काळात शंकरराव कोल्हे हे महसूल मंत्री असताना वसंतदादा पाटील यांचे काळात पत्रकार संघास मोठा निधी उपलब्ध केला होता.त्यातून त्यांनी ’माहुर’ हि इंदिरा पथ मार्गावर असलेली इमारत विकत घेतली होती.हा पत्रकार संघ वाढावा व सुरक्षित हातात राहावा,त्यातून पत्रकारांच्या हिताचे कार्यक्रम व्हावे अशी त्यांची शेवटची इच्छा होती. त्यांचे वडील महिपती कुलकर्णी हे संत साईबाबा यांच्या काळातील साक्षिदार व तत्कालीन पाटबंधारे विभागातील मोजणीदार होते.त्यातून त्यांना जलसंपदा विभागाच्या विषयाची आवड निर्माण झाली होती.त्यांनी लोकसत्ता,इंडियन एक्सप्रेस,टाइम्स ऑफ इंडिया आदी वर्तमान पत्रात सुमारे पाच साडेपाच दशक काम केले होते.आजही विविध शासकीय विभागातील बड्या अधिकार्‍यांशी त्यांचा संपर्क टिकून होता.मात्र काही दिवसापूर्वी घरात त्यांचा चक्कर येऊन खुब्यास मोठी गंभीर इजा पोहचली होती.त्यातून त्यांना त्यांच्या मुलांनी आधी डॉ.जपे हॉस्पिटल व नंतर नाशिक येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.मात्र सर्व उपचार अपयशी ठरुन आज त्यांची पहाटे 05 वाजेच्या सुमारास प्राण ज्योत मालवली आहे. स्व.स.म.कुलकर्णी यांचे निळवंडे कालवा कृती समितीच्या दुष्काळी 182 गावांच्या निळवंडे प्रकल्पाच्या लढ्यावर बारीक लक्ष होते.व त्या लढ्याचे सर्व श्रेय ते कालवा कृती समितीस देत असत व राजकीय नेत्यांना खडे बोल सुनावणीस मागेपुढे पाहत नसत.स्पष्टवक्तेपणा व स्वाभिमान हा त्यांचा सभावगुण अखेरपर्यत टिकून राहिला होंता.शिर्डीत आयोजित मराठी पत्रकार संघाच्या अनेक राज्यस्तरीय अधिवेशनास त्यांनी हजेरी लावली होती.व राजकीय नेत्यांच्या मदतीशिवाय अधिवेशन भरवणे हि  कल्पना त्यांना विशेष भावली होती.आपल्या पत्रकार संघाचे असे अधिवेशन व्हावे अशी त्यांची इच्छा होती.स्वाभिमानी पत्रकारांना ते कायम पाठबळ पुरवत असत हा त्यांचा स्वभाव अनेकांना त्यांचेकडे खेचून घेत असत.त्यांच्या जाण्याने पत्रकरितेतील भीष्मपितामह गमावल्याची पत्रकारांची भावना निर्माण झाली असल्यास नवल नाही. त्यांच्या निधनाबद्दल माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, माजी आ. अशोक काळे, आ.आशुतोष काळे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे, डॉ. एकनाथ गोंदकर, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मंगेश पाटील, माजी उपनगराध्यक्षा मिनल खांबेकर,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नानासाहेब जवरे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

COMMENTS