Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाचगणीच्या भुरळ घालणार्‍या नैसर्गिक सौंदर्यात सेल्फी पॉइंटची भर; पर्यटकांची तुफान गर्दी

पाचगणी / वार्ताहर : पाचगणी शहराच्या पर्यटन विविधतेत भर घालण्याच्या हेतूने मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी कल्पकतेने ‘आय लव पांचगणी’ सेल्फी पॉइंट

दुकानदारांसह विक्रेत्यांच्या लसीकरणाच्या तपासणीचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
करोनाविरुद्ध लढाईत हवाईदलही सहभागी, ऑक्सिजन-औषधं करणार एअरलिफ्ट | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24
कला पथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत

पाचगणी / वार्ताहर : पाचगणी शहराच्या पर्यटन विविधतेत भर घालण्याच्या हेतूने मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी कल्पकतेने ‘आय लव पांचगणी’ सेल्फी पॉइंट निर्माण केला आहे. या निर्मितीमुळे पाचगणीच्या भुरळ घालणार्‍या निसर्ग सौंदर्यात मानवनिर्मित सेल्फी पॉईंटची भर पडली आहे. पर्यटक, तरुणाईलाच नव्हे, तर स्थानिकांना या ठिकाणी सेल्फी किंवा फोटो घेण्याचा मोह आवरता येत नाही.

दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरातील मोक्याच्या ठिकाणी टाकाऊ वस्तूंपासून घोडा, फुलपाखरू स्ट्रॉबेरीसह विविध शिल्पे आकारास आली आहेत. पाचगणी शहराच्या प्रवेशद्वाराजवळ हॉटेल रवाईन शेजारी मुख्य रस्त्यावर उभारलेला आय लव पाचगणी हा सेल्फी पॉईंट पर्यटकांची गर्दी खेचत आहे. अस्वच्छ जागांचा फिटलेला पांग, अडगळीच्या जागांचे बदललेले रुपडे, स्थानिकांसोबत पर्यटकांनाही आकर्षित करत आहे. टाकाऊ साहित्याच्या जागा सुंदर फूल-वेलींनी हिरव्यागार रोपांनी व फुलांच्या ताटव्यांनी बहरल्या आहेत.
मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी प्रशासक म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून शहरात नगर विकासाच्या दृष्टीने रचनात्मक बदल होत आहेत. स्वच्छता अभियानाच्या केवळ अंमलबजावणीसाठी नव्हे तर नागरिकांची, पर्यटकाची मानसिकता दलण्यावर भर दिला आहे. त्यामुळे स्वच्छता अभियान ही चळवळ आता लोकचळवळ बनली आहे. शहर स्वच्छता ही माझी जबाबदारी आहे, अशी भावना प्रत्येक नागरिकांच्या मनात निर्माण करण्यात पालिका यशस्वी झाली आहे.
कचरा पेटवून नष्ट करण्याच्या प्रथेला येथे कायमची मूठमाती देण्यात यश आले आहे. त्यामुळे कंपोस्ट खत निर्मिती, पर्यावरण प्रदूषणास आळा घालण्याबरोबरच पालिकेच्या उत्पन्नात वाढ होत आहे. रस्त्यांच्या साईडपट्ट्या फूटपाथ यांनी कात टाकली आहे. स्वच्छतेचा वसा घेतलेल्या गिरीनगरी पाचगणीत प्रत्येक नागरिकांने स्वच्छता ही माझी सवय आहे आणि तो वसा मी पुढे नेला पाहिजे, असाच जणू प्रण केला आहे.

COMMENTS